ढाका| पाकिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून टी२० मालिकेत यजमानांना व्हाईटवॉश दिल्यानंतर उभयंतांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात मोठा विजय मिळवत पाकिस्तानने कसोटी मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. त्यानंतर हे दोन्ही संघ ढाका येथे दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत. परंतु या सामन्यात खेळाडूंपेक्षा पाऊसाचाच जास्त खेळ पाहायवास मिळतो आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (०५ डिसेंबर) पावसाच्या अडथळ्यामुळे केवळ ६.२ षटकांचा खेळ झाला. यानंतर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन मात्र मैदानावर अगदी लहान मुलांप्रमाणे मस्ती करताना दिसला आहे.
तर झाले असे की, सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५७ षटकांचा खेळ झाला. यावेळी प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तान संघ २ बाद १६१ धावा अशा स्थितीत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाच्या सरी कोसळू लागल्याने खेळ सुरू होण्यास विलंब झाला. अखेर दुसऱ्या सत्रापासून खेळ सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले. परिणामी ओली खेळपट्टी आणि हवामानाच्या स्थितीमुळे ६.२ षटकांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
यावेळी पाकिस्तान संघाच्या २ बाद १८८ धावा झाल्या होत्या. कर्णधार बाबर आझम नाबाद ७१ धावा तर अझहर अली नाबाद ५२ धावांवर खेळत होते.
दरम्यान पाऊस सुरू होताच ग्राउंड्समनने कव्हर्सने खेळपट्टी झाकली होती. पाऊस थांबल्यानंतर या कव्हर्सवर थोड्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. हे पाहून बांगलादेशच्या शाकिबला मस्ती सुचली. तो वेगाने त्या कव्हर्सच्या दिशेने धावत गेला आणि या पावसाचे पाणी साचलेल्या कव्हर्सवर मोठी डाईव्ह मारली.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1467428692624171008?s=20
Excitement when the play is officially called off for the day @Sah75official ???????? #BANvPAK pic.twitter.com/4ewyRqM23u
— Sikandar Bakht (@ImSikandarB) December 5, 2021
त्याचा हा मस्ती करतानाचा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून त्यांचे बालपणीचे दिवस आठवले आहेत.
याच शाकिबला अद्याप या कसोटी सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही. त्याने आतापर्यंत १५ षटके गोलंदाजी करताना ३३ धावा देत पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला बाद केलेले नाही. आपल्या या गोलंदाजीदरम्यान त्याने ६ षटके निर्धाव टाकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टेलरला बाद केलेल्या चेंडूवर सिराजने दिली प्रतिक्रिया; पाहा तो ‘ड्रीम बॉल’
मुंबई कसोटी जिंकण्याच्या वाटेवर असलेल्या टीम इंडियाला डबल झटका! दुखापतीमुळे २ खेळाडू मैदानाबाहेर