---Advertisement---

का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल

---Advertisement---

सिडनी | गेल्याच आठवड्यात स्टिव स्मिथ आणि डेव्हिड वार्नरचा नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ते आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंजाचा सराव करत होते.

यापाठोपाठ आता पुन्हा एकदा स्टिव स्मिथचा दुसरा फोटो व्हायरल होत आहे. यात स्मिथ आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगरसह हाॅटेलमध्ये ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बंदीमुळे गेले काही महिन स्मिथ देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

7 News Sydney ने दिलेल्या वृत्तानुसार त्या दोघांमध्ये यावेळी क्रिकेटवर चर्चा झाली. “आपण यापुढे कसे पुढे जाऊ यावर आम्ही चर्चा केली. मला जे कष्ट घ्यायचे आहेत ते मी सर्व घेत आहे. आता पाहु कसे पुढे जाता येईल.” असे यावेळी स्मिथ म्हणाला.

स्मिथ – वार्नरवरील बंदी कमी होण्याची अपेक्षा होती परंतु गेल्याच आठवड्यात क्रिकेट आॅस्ट्रेलियाने असे काही होणार नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना एक वर्षाच्या बंदीला सामोरे जावेच लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

या कारणामुळे टीम इंडियाला कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान

टीम इंडियातून वगळल्यानंतर एमएस धोनी झाला या खेळाच्या स्पर्धेत सामील

तब्बल ५५ वर्षांनंतर पुन्हा घडला तो इतिहास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment