भारतीय वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. मोहम्मद शमी सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. तो नेहमी आपल्या व्यायाम करत असलेले फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
मोहम्मद शमीने शनिवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून आपली मुलगी आइराचा एक क्यूट डांस केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आइरा सुप्रसिद्ध गाणे ‘एक बार परदा हटा दे शराबी’ यावर डान्स करत आहे. आइराने केलेला डान्स पाहण्यासारखा आहे.
व्हिडिओ पाहून अनेक लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. इतकेच नव्हे तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज मोहम्मद कैफ यांनी देखील या डान्स व्हिडिओवर कमेंट केली आहे. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले की, ‘ग्रेट बेबो’.
https://www.instagram.com/reel/CQ0LneEldJP/?utm_source=ig_web_button_share_sheet
पत्नी हसीन जहां आणि मोहम्मद शमी वेगळे राहत आहेत
पत्नी हसीन जहांने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. इतकेच नाही तर शमीचे तिच्याशिवाय इतर महिलेशी संबंध असल्याचे म्हटले होते. ही बाब कोर्टात पोहोचली होती आणि सध्या दोघेही स्वतंत्र राहात आहेत. हसीन जहांने शमीचे आडनाव तिच्या मुलीच्या आइराच्या नावापुढे काढले असून तिने स्वतःचे आडनाव मुलीच्या नावासमोर लावले आहे. हसीनने आपल्या मुलीचे नाव आइरा जहां ठेवले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचा भाग होता
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेचा मोहम्मद शमी एक भाग आहे. इतकेच नव्हे तर जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामन्यात देखील मोहम्मद शमीचा संघात सहभाग होता. या मालिकेत शमी भारतासाठी वेगवान गोलंदाजी विभागाचे करत प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. शमीकडे दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: पंचांकडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर अन्याय? डिविलियर्स अन् स्टेनही चकित
धोनीच्या काळात चमकलेली ‘कुलचा’ जोडी करणार ‘लंकादहन’, दिग्गजाकडून एकत्र खेळवण्याची मागणी
अस्सल गिफ्ट! भज्जीला ४१व्या वाढदिवशी मिळाली ‘खास’ भेट; पहिल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ






