लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा १४ वा सामना पार पडला. यासामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले. आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आपला पहिलाच सामना खेळत असलेला डेविड वाॅर्नर फक्त ४ धावा करुन बाद झाला. रवि बिश्नोई याच्या (Ravi Bishnoi) चेंडूवर तो बाद झाला. बिश्नोईने डेविड वाॅर्नरला तिसऱ्यांदा बाद केले आहे. लखनऊविरुद्धच्या सामन्यात दिल्लीची सुरुवात शानदार झाली. परंतु, वाॅर्नरला जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.
पृथ्वी शाॅने धमाकेदार फलंदाजी करत शानदार अर्धशतक लगावले. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ६१ धावा केल्य, ज्यामध्ये ९ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश होता. शाॅ बाद झाला, तेव्हा वाॅर्नर ४ धावांवर खेळत होता. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.
या सामन्यात ९ व्या षटकात बिश्नोईच्या तिसऱ्या चेंडूवर वाॅर्नर फसला. बिश्नोईचा सहज आणि सोपा चेंडू खेळणे कोणत्याही फलंदाजासाठी कठीण नव्हते, परंतु वाॅर्नरची शाॅट निवड योग्य ठरली नाही आणि हा महान फलंदाज फक्त ४ धावा करुन बाद झाला. बिश्नोईने क्षेत्ररक्षण सेटअपनुसार चेंडू वाॅर्नरच्या ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, यावर वाॅर्नरने ऑफ स्टंपच्या बाहेर जात हा चेंडूंचा पाठलाग करत कट शाॅट खेळला. परंतु, चेंडू मागच्या दिशेने गेला आणि आयुष बदोनीने झेल घेतला. वार्नर बाद झाल्यानंतर खुप नाराज होता आणि पेव्हिलीयनमध्ये जाताना तो आपली बॅट हवेत टाकताना दिसला.
https://twitter.com/mohitherapy/status/1512096507474092032?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512096507474092032%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fipl-2022-watch-video-of-ravi-bishnoi-spoils-david-warners-return-to-delhi-australian-registers-unwanted-record-versus-indian-spinner-2869961
लखनऊने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने शाॅच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकात ३ विकेट्स गमावत १५० धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना क्विंटन डी काॅकने ५२ चेंडूत ८० धावा केल्या. डी काॅकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दिल्लीने दिलेले लक्ष्य लखनऊने ४ विकेट्स गमावत २ चेंडू राखूनच गाठले. कर्णधार केएल राहुलने २४ धावा केल्या. लखनऊ संघाचा सलग तिसरा विजय आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यावेळी गांगुली म्हणालेला सचिनला बाद केलस, आता हे लोक तुला मारतील’, शोएब अख्तरचा खुलासा
‘रिषभ पंत एक चांगला कर्णधार’, एक-दोन नाही, तर तीन दिग्गजांकडून कौतुक