वेस्ट इंडीज संघ सध्या भारत दौऱ्यावर(IND vs WI) असून दोन्ही संघांमध्ये सध्या टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने (team india) ८ धावांनी जिंकत तीन सामन्यांची ही मालिका आपल्या नावावर केली आहे. या मालिकेत भारताने २-०ने आघाडी घेतली आहे. कोलकत्ताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने(rishabh pant) २८ चेंडूत ७ चौकैर आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याच्या धमाकेदार खेळीमुळे भारतीय संघ १८६ धावा करण्यात यशस्वी झाला. त्याला या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.
सामन्यानंतर जेव्हा रिषभला या पुरस्कारासाठी आमंत्रित केले होते, तेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माने जी प्रतिक्रीया दिली ती सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. रिषभला पुरस्कार मिळण्यापूर्वी रोहित समालोचक हर्षा भोगलेंशी बोलत होता. त्यानंतर रिषभला बोलवले गेले. रोहित जाता-जाता समालोचक हर्षा भोगलेंना म्हणाला की, ‘रिषभ पंत सामनावीर आहे काय?’ रोहितच्या या प्रतिक्रीयेला उत्तर देत हर्षा भोगले उत्तरले, ‘रोहित त्याने शानदार फलंदाजी केली म्हणून.’
https://twitter.com/addicric/status/1494736105685630984?s=20&t=NUKm_jSFa1fPeKELMW4oPA
हा पुरस्कार घेताना रिषभ म्हणाला, “संघाला कोठे हवी तेथे मी फलंदाजी करण्यास तयार आहे. मी स्थीतीनुसार फलंदाजी करण्यावर विश्वास ठेवतो. सरावाने मी स्वत:चा खेळ सुधरवत आहे. मी व्यंकटेशशी बोललो होतो की आम्ही गोष्टी साध्या आणि सरळ ठेवू आणि प्रत्येक चेंडू काळजीपूर्वक खेळू. क्वारंटाइनसह सर्व सामने खेळणे कठीण आहे. परंतु मला नेहमीच भारतासाठी खेळायचे होते.”
वेस्ट इंडिजच्या अर्धशतकवीराचे कौतुक करताना रिषभ म्हणाला, “पॉवेल गोळीच्या गतीने चेंडू मारत होता. यावेळी मी यष्टीमागे उभा असल्याचा मला आनंद झाला. कारण तो माझ्यासोबत दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणार आहे. पण शेवटी मला भारतासाठी प्रत्येक सामना जिंकायचा आहे.”
पंतने आपल्या डावात व्यंकटेश अय्यरसोबत ७६ धावांची भागीदारी केली होती. १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाला २० षटकांमध्ये ३ गडी गमावून फक्त १७८ धावा करता आल्या. यादरम्यान निकोलस पूरनने ४१ चेंडूत ६२ तर रोव्हमन पॉवेलने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची नाबाद खेळी केली. या मालिकेतील शेवटचा सामना २० फेब्रुवारीला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रकरण चिघळलं! पाकिस्तान बोर्डावर धोखाधडीचा आरोप करणारा खेळाडू पीएसएलमधून बॅन, वाचा सविस्तर
प्रो कबड्डी: पुणेरी पलटणची जयपूर पिंक पँथर्सवर ७ गुणांनी मात, पण फायदा मात्र बंगळुरू बुल्स संघाचा
INDvsSL: भविष्यासाठी ऍक्शन सुरू; पूर्वसूचना देत रहाणे, पुजारासह ४ सीनियर्सची कसोटी संघातून सुट्टी