सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2020 मधील 29 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल हैदराबादला 20 षटकांत केवळ 147 धावा करता आल्या आणि चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकला. सामना गमावला असला तरी हैदराबादच्या संदीप शर्माच्या झेल घेण्याच्या प्रयत्नांचीच सर्वत्र चर्चा आहे.
या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने आपल्या गोलंदाजीदरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. वास्तविक, संदीप शर्मा चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत असताना 18 वे षटक फेकले होते. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने हवेत फटका मारला. त्याचवेळी झेल घेण्याच्या प्रयत्नात संदीपने चेंडू टाकून झाल्यावर लगेचच हवेत उडी घेतली. पण त्याच्या हातून झेल सुटला, तरीही त्याने केलेल्या शानदार प्रयत्नासाठी त्याची प्रशंसा होत आहे. संदीपने त्याच्या प्रयत्नांनी सर्वच क्रिकेटप्रेमींचे मने जिंकली आहेत.
https://twitter.com/chaitu_20/status/1316050093435359232
This effort of Sandeep sharma… Truly SUPERMAN stuff 😱🙌 #CSKvSRH pic.twitter.com/fynRqWbKyw
— Abhishek dwivedi (@abhishek_srkfan) October 13, 2020
— VINEET SINGH (@amit9761592734) October 13, 2020
संदीपने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत केवळ 19 धावा देऊन एकूण 2 बळी घेतले. त्याने चेन्नईचे सलामीवीर सॅम करन आणि फाफ डू प्लेसिस यांना बाद केले.
हैदराबादचा पुढील सामना 18 ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अबू धाबी येथे दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आयपीएलमध्ये जागा आहे का?”, करीना कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी केली विनंती
देशाकडून उत्कृष्ट कामगिरी, आयपीएलमध्ये मात्र फ्लॉप, असे का? मॅक्सवेलने सांगितले कारण
राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू