इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १५ व्या हंगामातील १६ वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरातच्या राहुल तेवातिया याने शेवटच्या चेंडूवर २ षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. गुजरात टायटन्सचा आयपीएल २०२२ मधील सलग तिसरा विजय आहे. तेवातिया(Rahul Tewatia) या कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार रविंद्र जडेजा यांच्या खास क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे.
डावाच्या २० व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर गुजरातला विजयासाठी १२ धावांची गरज होती. तेवातिया क्रिजवर होता, त्याने ओडियन स्मिथच्या षटकाच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर शानदार षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. तेवातियाच्या अगोदर महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जडेजा यांनी सुद्धा आयपीएलमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामूळे तो त्यांच्या खास क्लबमध्ये सामिल झाला आहे.
धोनीने २०१६ मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती. २०१६ साली आयपीएलच्या ५३ व्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना अक्षर पटेलच्या षटकाच्या ५ व्या आणि ६ व्या चेंडूवर ही शानदार कामगिरी केली होती. तेव्हा त्याने ३२ चेंडूत ६४ धावा केल्या होत्या. त्याला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
रविंद्र जडेजाने सीएसकेकडून खेळताना २०२० मध्ये अशी कामगिरी केली होती. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना कमलेश नागरकोटीच्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर षटकार लगावले आणि संघाला ६ विकेट्सने विजय मिळवून दिली. या सामन्यात जडेजाने ११ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या.
Only #Tewatia can pull off a Tewatia. 🤩🔥
And #GujaratTitans
wins this match.
Tewatia isn't a human , it is a concept.
Smiles are back on #HardikPandya face after that run out.#IPL2022 #IPL #RahulTewatia #PBKSvsGT #ShubhmanGill #TataIPL #TATAIPL2022 #PunjabKings #OdeanSmith pic.twitter.com/4JKMwgM8RO— Rj Yash (@Rjyash07) April 8, 2022
दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, गुजरातने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकात ९ विकेट गमावत १८९ धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनने २७ चेंडूत ६४ धावा केल्या. शिखर धवनने ३५ तर राहुल चाहरने २२ धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शुबमन गिलने ५९ चेंडूत ९६ धावा केल्या, तर राहुल तेवातियाने ३ चेंडूतच १३ धावा केल्या, या दरम्यान त्याने ४३३.३३ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याने हलवाईच्या दुकानात बसले पाहिजे, आता त्याला बॅटिंग…’, बाद होताच मयंक चाहत्यांच्या निशाण्यावर
अफलातून! हार्दिक पंड्याने घेतला सुपर कॅच; पण ‘त्या’ एका चुकीमुळे लिविंगस्टोनला मिळाले जीवदान