सोमवारी (११ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेला सामना हैदराबादने ८ विकेट्स राखून जिंकला. त्यांनी गुजरातचा विजयरथ रोखत हंगामातील दुसरा सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हैदराबादच्या या विजयात त्यांचा ३१ वर्षीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी याचाही मोठा हात राहिला. त्याने क्षेत्ररक्षणाबरोबरच फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. परंतु या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली आहे.
गुजरातच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावादरम्यान १४व्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. या षटकात गुजरातकडून राहुल तेवतिया गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्या चेंडूवर त्रिपाठीने (Rahul Tripathi) जोरदार फटका मारला आणि चेंडू लाँग ऑफवरून सीमारेषेच्या बाहेर गेला. त्रिपाठीच्या या कडकडीत फटक्यानंतर चेंडू षटकारासाठी सीमारेषेबाहेर गेला (Rahul Tripathi Six) खरा, परंतु दुसरीकडे या फटक्यामुळे त्रिपाठीला मैदानाबाहेर जावे लागले.
त्रिपाठी या सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगमुळे (Rahul Tripathi Hamstring) वेदनेत होता. अशात त्याने षटकारासाठी शरीर ३६० फिरवले आणि त्याचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले. यामुळे त्याला फार वेदनाही झाल्या आणि षटकार मारल्यानंतर तो वेदनेने मैदानावर तडफडू लागला. त्यानंतर त्वरित हैदराबाद संघाची मेडिकल टीम त्याला तपासण्यासाठी मैदानावर धावली. यावेळी स्ट्रॅटिजिक टाइमआऊटही घेण्यात आला. परंतु मेडिकल आणि फिजिओंचे प्रयत्न कामी आले नाहीत आणि त्रिपाठीला रिटायर्ड हर्ट होऊन (Rahul Tripathi Retired Hurt) मैदानाबाहेर जावे लागले.
https://twitter.com/Raj93465898/status/1513567033564172295?s=20&t=q8_44ImfZ0NMeLNTusGqWg
https://twitter.com/Raj93465898/status/1513567298405433346?s=20&t=9a6fICb6o36rdTUFKi-ewA
Not a good news for SRH fans – Rahul Tripathi walking off the field during Injury. pic.twitter.com/HmpmLJXsOk
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 11, 2022
त्रिपाठीच्या एकहाती झेलची भरपूर चर्चा
या सामन्यात गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल (Shubamn Gill) या सामन्यात ९ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. गिल मोठी खेळी करू शकत होता, पण राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याने अनपेक्षित झेल घेत त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याला बाद करण्यासाठी १०० टक्के गुण राहुलला जातात, कारण गिलने खेळलेल्या शॉटमध्ये कोणतीही कमतरता दिसली नव्हती.
राहुल त्रिपाठी सर्कलच्या आतमध्ये कवर्सच्या दिशेला क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. गिलने एक कडक शॉट खेळला, पण त्रिपाठीने उत्कृष्ट डाईव्ह मारून तो एका हातात झेलला. त्रिपाठीने हा झेल घेण्यासाठी दाखवलेल्या चhळाईचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
आधीच जखमी असलेल्या दीपक चाहरबाबत वाईट बातमी, सीएसकेपुढील अडचणींमध्ये वाढ
IPL2022| आरसीबी वि. सीएसके सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
शमीने झेल सोडल्यामुळे हार्दिक पंड्या रागाने लालेलाल, आगपाखड करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल