भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोट येथे खेळला जाणार आहे. सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला सायंकाळी ७ वाजता सुरूवात होणार आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारत २-१ असा मागे आहे. भारताचा कर्णधार रिषभ पंत, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि संघसहकारी हे राजकोटला पोहोचले असून त्यांचे पांरपरिक स्वरूपात स्वागत करण्यात आले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून भारताच्या विशाखापट्टणम ते राजकोट प्रवासाचा व्हीडिओ शेयर केला आहे. यामध्ये भारतीय संघ हॉटेलवर पोहोचताना त्यांचे गरबा या पारंपरिक नृत्याने स्वागत करण्यात आले हे दाखवले आहे. या संगीतावर अर्शदीप सिंग यानेही थोडा डान्स केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1537095734339641344?s=20&t=SsBAAVH2LWt_e9UZXyt2TA
या मालिकेत भारत रिषभ पंत याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. विशाखापट्टणम येथे झालेला तिसरा टी२० सामना जिंकल्यावर भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. या सामन्यात सलामीजोडी इशान किशन-ऋतुराज गायकवाड यांनी तुफानी फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. युझवेंद्र चहलने ड्वेन प्रिटोरियस, रस्सी व्हॅन डर डुसेन आणि हेन्रिच क्लासेन या प्रमुख फलंदाजांना बाद करत संघाचा विजय सोपा केला होता.
या मालिकेतील शेवटचा टी२० सामना रविवारी (१९ जून) बेंगलोर येथे खेळला जाणार आहे. हा सामना संपल्यावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, पंत आणि अय्यर हे इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. ही मालिका संपल्यावर इंग्लंड दौऱ्यासाठी निघणार आहे. त्यांच्यासोबत सपोर्ट स्टाफ आणि फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांचाही समावेश असणार आहे.
द्रविड यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या आयर्लंड टी२० दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ २२ जूनला निघणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रशिक्षकांनी हार्दिकला शिकवण्याची गरज नाही’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केलेल्या विधानाने खळबळ
आयर्लंड दौऱ्यात निवड न झाल्याने दुखावला ‘राहुल’; ट्वीट करत मांडली व्यथा