भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी२० सामना विशाखापटणममध्ये खेळला गेला. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड या टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. पण मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने इशान किशनसोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करुन देत विजयाचा पाया रचला. त्याचबरोबर त्याने मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये बाद न झालेल्या डेविड मिलर याचा उत्कृष्ट झेलही टिपला.
भारतीय संघाने मंगळवारी (१४ जून) खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. भारताने (India vs South Africa) प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १७९ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर जोडी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन यांचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. मात्र भारताने बनवलेल्या १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.
दक्षिण आफ्रिकेने लक्ष्याचा पाठलाग करताना आपली पहिली विकेट २३ धावांवर गमावली. त्यानंतर सातत्याने विकेट्स घेण्यास भारतीय गोलंदाजांना यश आले. फलंदाजीला आलेल्या डेविड मिलरने ११व्या षटकातील सहाव्या म्हणजेच शेवटच्या चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करीत आक्रमक फटका मारला. पण, हर्षल पटेलने त्या चेंडूला जास्त धीम्या गतीने फलंदाजाकडे फेकला असल्यामुळे तो चेंडू मिलरच्या बॅटला चांगल्याप्रकारे लागला नाही आणि चेंडू कव्हरच्या दिशेने उडाला. कव्हरवर उभा असलेल्या ऋतुराजने बरोबर वेळेवर उडी मारत एका हाताने तो झेल (Ruturaj Gaikwad Stunning Catch) टिपला. आणि त्याचबरोबर मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये बाद न झालेल्या डेविड मिलर अखेर बाद होऊन तंबूत परतला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, या ५ सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी२० सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे शुक्रवार दिनांक १७ जून रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना देखील भारतासाठी करो अथवा मरोचा सामना असेल. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकायची असेल तर यापुढील दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. तसेच चौथ्या सामन्यांत भारताला विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याची संधी उपलब्ध असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उगाचच रुटने १७ महिन्यांत केली नाहीत १० शतके; वडील म्हणाले, ‘रोज एका पायावर तास-न्-तास फलंदाजी..’
‘इशान-ऋतुराज’ जोडीची कमाल; तब्बल दहा वर्षापूर्वीचा विक्रम मोडला