---Advertisement---

द गोल्डन आर्म! शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला अन् श्रेयसने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट

shreyas iyer wicket
---Advertisement---

Shreyas Iyer Bowling :- भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर याची बॅट देशांतर्गत क्रिकेटमध्ये शांत दिसतेय. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या डावात त्याने झटपट अर्धशतक झळकावले. मात्र त्यानंतर आता दुसऱ्या फेरीत तो पुन्हा सपशेल अपयशी ठरला. भारत ड संघाचा कर्णधार असलेल्या अय्यरला भारत अ संघाविरुद्ध खातेही उघडता आले नाही. मात्र, फलंदाजीत फ्लॉप ठरल्यानंतर त्याने गोलंदाजीत सर्वांना अचंबित करणारी कामगिरी केली आहे.

अनंतपूर येथील ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियमवर भारत अ विरुद्ध भारत ड संघात सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात अय्यरने गोलंदाजीत हात आजमावला. विशेष म्हणजे, त्याने पहिल्याच चेंडूवर भारत अ चा कर्णधार मयंक अग्रवालला बाद केले. अय्यरने किंचित उसळणारा चेंडू टाकला, ज्यावर मयंकने साधारण शॉट मारला. पण तो चेंडू थेट गोलंदाजाच्या हातात गेला. श्रेयसने त्याच्याच चेंडूवर चांगला झेल घेतला आणि मयंकची विकेट मिळवली. विकेट मिळाल्यानंतर त्याचे सेलिब्रेशनही पाहण्यासारखे होते. मयंक 56 धावांवर बाद झाला.

श्रेयस अय्यरला 6 वर्षांनंतर विकेट मिळाली
अशाप्रकारे अय्यरला 6 वर्षांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विकेट मिळाली आहे. अखेरची त्याने प्रथम श्रेणी विकेट 2018 मध्ये विकेट घेतली होती. त्यावेळी त्याने सौराष्ट्रच्या चेतन साकारियाला बाद केले होते.

विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर केवळ निवडक प्रसंगी गोलंदाजी करतो. भारतासाठी 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही त्याने केवळ 45 चेंडू टाकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप त्याला अद्याप यश मिळालेले नाही. मात्र देशांतर्गत सामन्यांमध्ये अय्यरची विकेट घेण्याची ही 11वी वेळ आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघ 290 धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारत अ कडून शम्स मुलानी (89 धावा) आणि तनुष कोटीयन (53 धावा) यांनी चांगल्या खेळी केल्या. तर हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारत ड संघ 183 धावांवरच सर्वबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

मायकल वॉनच्या मुलाची धमाल, 11 विकेट घेऊन एकहाती जिंकवला सामना!
संघ जिंकल्याच्या आनंद, चक्क कुबड्या घेऊन मैदानात धावत खेळाडूचं भन्नाट सेलिब्रेशन
एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतरच मी क्रिकेटला अलविदा करेन; 35 वर्षीय क्रिकेटपटूचे विधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---