कोणत्याही खेळात विजय सर्व प्रकारचे दु:ख, वेदना विसरायला लावतो. क्रिकेटच्या मैदानावरही अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत, जिथे खेळाडू दुखापतीनंतरही संघासाठी सर्व शक्तीनिशी लढले आणि विजय मिळवून दिला. नुकतेच इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅंटन याच्याबाबतीतही असेच घडले. पाय मोडला असतानाही, तो संघासाठी मैदानात आला. त्यानंतर जेव्हा शेवटच्या क्षणी संघाला रोमहर्षक विजय मिळाला, तेव्हा तो कुबड्याच्या सहाय्याने मैदानात उतरला. तसेच सर्वांसोबत त्याने सेलिब्रेशन देखील केले.
इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी सॉमरसेटने रोमहर्षक सामन्यात सरेचा 112 धावांनी पराभव केला. सरे विरुद्धच्या या सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या क्षणी लागला. डावखुरा फिरकीपटू जॅक लीच याने शेवटच्या फलंदाजाला बाद करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. तेव्हा अखेरीस सॉमरसेटला 5-6 मिनिटांत केवळ एका विकेटची गरज होती.
त्या शेवटच्या विकेटसह मैदानावर उपस्थित असलेले सर्व सॉमरसेट खेळाडू जॅक लीचकडे धावले. तर ड्रेसिंग रूममधून संघाचे इतर खेळाडूही आनंदाने उड्या मारून मैदानावर आले. सेलिब्रेशनमध्ये मग्न असलेल्या या खेळाडूंमध्ये टॉम बँटनने सर्वांना आश्चर्यचकित केले. गेल्या दोन दिवसांपासून पाय तुटल्यामुळे त्रस्त झालेल्या बँटनने कुबड्याच्या सहाय्याने धावण्यास सुरुवात केली. लंगडलेल्या अवस्थेतही बँटन मैदानात उतरेल, असे कोणाला वाटले नव्हते. मात्र, विजयाच्या आनंदाने या त्याचे सर्व दुःख काही काळ दूर केले.
Iconic #SOMvSUR#WeAreSomerset pic.twitter.com/XMHp6JZEIO
— Somerset Cricket (@SomersetCCC) September 12, 2024
बँटनने एक दिवस आधी अशाच अवस्थेत असताना दमदार खेळी केली होती. बँटनने सामन्याच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावत 132 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फलंदाजीसाठी त्याच्या नियमित क्रमांकावर आला नाही. त्यानंतर, सॉमरसेटने 153 धावांवर 9 विकेट गमावल्या असताना, संघासाठी बँटन शेवटचा फलंदाज म्हणून मैदानात आला. त्याने जॅक लीचसोबत 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बँटनने 65 चेंडूत 46 धावांची लढाऊ खेळी खेळली. यासोबतच संघाला 224 धावांपर्यंत मजल मारली, जी विजयासाठी पुरेशी ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
रात्री अडीच वाजता मैसेज करुन रोहितने पियुष चावलाला खोलीत बोलवलं, मग पुढे काय घडलं?
‘..नजर लग जाएगी’, एलिसा पेरीच्या फोटोंवर चाहते फिदा
‘BGT’ ट्राफीपूर्वी स्मिथ, कोहलीबद्दल दिग्गज खेळाडूने केली मोठी भविष्यवाणी