भारतीय संघ घरच्या मैदानावर (19 सप्टेंबर) पासून बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. तत्पूर्वी भारतीय संघ यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. कारण दोन्ही संघांमध्ये बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळवली जाणार आहे. दरम्यान दिग्गज खेळाडू मॅक्सवेल म्हणाला की, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ आमने-सामने येण्याची वाट पाहत आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) म्हणाला, “हे दोन सुपरस्टार फलंदाज स्मिथ आणि कोहली ज्या पद्धतीने खेळत आहेत, मला वाटते की त्यांच्या फलंदाजीचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या निकालावर खूप परिणाम होईल. आमच्या काळातील या दोन सर्वोत्तम खेळाडूंना समोरासमोर खेळताना पाहणे आनंददायी ठरेल.”
याआधी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) म्हणाला होता की, “विराट कोहली विचार आणि कृतीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन आहे यावर माझा विश्वास आहे. तो ज्या प्रकारे आव्हानांना तोंड देतो आणि प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. भारतीय खेळाडूंमध्ये तो सर्वाधिक ऑस्ट्रेलियन विचारांचा खेळाडू आहे.”
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे वेळापत्रक-
पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, ऑप्टस स्टेडियम पर्थ, (22 से 26 नोव्हेंबर)
दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, एडिलेड ओवल एडिलेड, (6 से 10 डिसेंबर)
तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, गाबा ब्रिस्बेन (14 ते 18 डिसेंबर)
चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, एमसीजी मेलबर्न, (26 ते 30 डिसेंबर)
पाचवा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, एससीजी सिडनी, (3 से 7 जानेवरी)
महत्त्वाच्या बातम्या-
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे पाहता येणार सामना? जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खैळाडू
आयर्लंडच्या क्रिकेटपटूवर भारतात उपचार, पत्नीमुळे मिळालं दुसरं जीवन