यंदाच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचं आयोजन चीनमध्ये होत आहे. शनिवारी (14 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील.
याआधी गुरुवारी भारतानं दक्षिण कोरियाचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. यासह 6 संघांच्या गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकेडे अमाद बटच्या नेतृत्वाखालील पाकिस्ताननंही उपांत्य फेरीतील आपलं स्थान पक्कं केलंय. सध्या पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
पाकिस्ताननं यजमान चीनचा 5-1 असा पराभव केला. आता शनिवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतील. आतापर्यंत टीम इंडियानं स्पर्धेतील चारही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं 3 विजय मिळवत 1 पराभव पत्कारलाय. भारतानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा एकूण 3 वेळा जिंकली आहे. गतवर्षी चेन्नईत पाकिस्तानला हरवून भारतानं विजेतेपद पटकावलं होतं. यंदा टीम इंडियाची नजरा चौथ्या विजेतेपदावर असेल.
भारत आणि पाकिस्तानचे संघ भारतीय वेळेनुसार दुपारी 1.15 वाजता आमनेसामने येतील. भारतीय चाहत्यांना सोनी नेटवर्कच्या टेन-1 आणि टेन-2 एचडी चॅनलवर सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लिव्ह (Sony Liv) ॲप आणि सोनी वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल. भारतीय चाहत्यांना सोनी लिव्ह ॲपवर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे.
भारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र देखील ठरला नव्हता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचं पारडं निश्चितच जड आहे.
हेही वाचा –
आयर्लंडच्या क्रिकेटपटूवर भारतात उपचार, पत्नीमुळे मिळालं दुसरं जीवन
विराट कोहली नाही, हा आहे टीम इंडियाचा सर्वात फिट खेळाडू! जसप्रीत बुमराहनं दिलं आश्चर्यकारक उत्तर
आयपीएल रिटेन्शन नियमांबाबत मोठी बातमी! या दिवशी जाहीर होणार रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या