शुक्रवारी(२५ सप्टेंबर) आयपीएल२०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १७५ धावा केल्या आणि चेन्नईला १७६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने १४ धावा केल्या. तो या सामन्यात लवकर बाद झाला असला तरी त्याने एक खास विक्रम केला आहे.
त्याने चेन्नईकडून खेळताना १००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळो तो २ आयपीएल संघांकडून १००० धावांचा टप्पा पार करणारा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १००० धावांचा टप्पा पार केला आहे. वॉटसनने चेन्नईकडून १००४ धावा केल्या आहेत. तर राजस्थानकडून २००८ ते २०१५ दरम्यान खेळताना २४७४ धावा केल्या आहेत.
त्याआधी २ आयपीएल संघांकडून १००० धावांचा टप्पा पार करण्याचा कारनामा डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, गौतम गंभीर, जॅक कॅलिस, रॉबिन उथप्पा आणि युसुफ पठाण यांनी केला आहे.
२ आयपीएल संघांकडून १००० धावांचा टप्पा पार करणारे फलंदाज –
शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स)
डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद
रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स)
गौतम गंभीर (कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स)
जॅक कॅलिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स)
रॉबिन उथप्पा (पुणे वॉरियर्स पुणे, कोलकाता नाईट रायडर्स)
युसुफ पठाण (राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स)






