आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आत्तापर्यंत सर्वाधिक दुखापतग्रस्त खेळाडूंचा संघ बनला आहे. हंगाम सुरू होताच त्यांचे तीन खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले असून, आता त्या सर्वांच्या बदली खेळाडूंच्या नावांची घोषणा देखील झालीये. मुंबई इंडियन्सविरुद्ध दुखापतग्रस्त झालेल्या रिस टोप्ली याच्या जागी आता आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वेन पार्नेल याला संघात संधी दिली. तसेच, रजत पाटीदारच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू वैशाक विजयकुमार याला संघात सामील करून घेतले.
🔊 ANNOUNCEMENT 🔊
South African all-rounder Wayne Parnell and Karnataka pacer Vyshak Vijaykumar replace Reece Topley and Rajat Patidar respectively for the remainder of #IPL2023.
Welcome to #ನಮ್ಮRCB, @WayneParnell and Vyshak! 🙌#PlayBold pic.twitter.com/DtVKapPSAY
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 7, 2023
आरसीबीने या वर्षीच्या हंगामाआधीच्या लिलावात इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज रिस टोप्ली याला 4 कोटींची रक्कम देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, हंगामातील पहिल्या सामन्यात त्याला दुखापतग्रस्त व्हावे लागले. मुंबईच्या डावाच्या आठव्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना तो उजव्या खांद्यावर पडला. तो पडताक्षणी वेदनेने विव्हळताना दिसला. त्यानंतर आता तो स्पर्धेबाहेर झाल्याची घोषणा 6 एप्रिल रोजी केली गेली.
त्याचवेळी मागील हंगाम गाजवलेला युवा फलंदाज रजत पाटीदार हा देखील टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामात सहभागी होणार नाही. त्यामुळे या जागेवर देखील आरसीबीने नव्या खेळाडूची घोषणा केली.
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी अष्टपैलू असलेला पार्नेल टोप्लीची जागा घेईल. त्याने यापूर्वी पुणे वॉरियर्स इंडिया व दिल्ली डेअरडेव्हिल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्याकडे जगभरातील अनेक टी20 खेळण्याचा अनुभव असून, डावखुरी वेगवान गोलंदाजी व आक्रमक फलंदाजी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीचा विचार केल्यास, 257 सामने खेळताना त्याने 259 बळी मिळवले आहेत. तसेच, 1800 पेक्षा जास्त धावाही त्याने काढल्या.
तर, पाटीदारच्या जागी संधी मिळालेल्या वैशाक विजयकुमार याच्याकडे कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव दिसून येतो. टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपल्या मध्यमगती गोलंदाजीने 22 बळी टिपलेत. तसेच, तो खालच्या क्रमांकावर येऊन आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो.
या दोघांव्यतिरिक्त संघाचा विदेशी अष्टपैलू विल जॅक्स यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी मायकेल ब्रेसवेल संघात खेळताना दिसतोय.
(Wayne Parnell And Vyshak Vijay Kumar Comes As Replacement Of Topley And Rajat Patidar For RCB In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण
आयपीएल सुरू असताना वाढल्या पृथ्वी शॉच्या अडचणी! सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने केले आरोप