---Advertisement---

याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ

Fans-At-Narendra-Modi-Stadium
---Advertisement---

जेवढी क्रेझ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची असते, तेवढी क्रेझ कदाचित इतर कुठल्याही सामन्याची पाहायला मिळत नाही. विश्वचषक 2023 स्पर्धेत 14 ऑक्टोबर रोजी उभय संघ नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे आमने-सामने असणार आहेत. उभय संघातील हा विश्वचषक इतिहासातील आठवा सामना असणार आहे. यापूर्वीचे सातही सामने भारताने जिंकले आहेत. तसेच, दोन्ही संघ विश्वचषकातील तिसऱ्या विजयासाठी एकमेकांशी भिडतील. दोन्ही संघ स्पर्धेत 2-2 सामने खेळले आहेत. अशात या सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेर भारतीय प्रेक्षकांचा समुद्र एकवटला आहे.

प्रेक्षकांची तुफान गर्दी
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील महामुकाबल्यासाठी प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या (Narendra Modi Stadium) बाहेर गर्दी करताना दिसत आहेत. 1 लाख 32 हजार प्रेक्षकसंख्या असलेल्या या स्टेडिअममध्ये चाहते हजेरी लावत आहेत. तसेच, चाहते तिरंगा घेऊन भारतीय संघासाठी नारेही लावत आहेत. विशेष म्हणजे, अहमदाबादमधील या सामन्यापूर्वी सुरक्षेची विशेष काळजी घेतली गेली आहे. त्यासाठी 11 हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1713079751055962448

एवढंच नाही, तर भारताच्या विजयासाठी हवन आणि पूजा केली जात आहे. पटना आणि कानपूरसारख्या शहरांमध्ये चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंचे पोस्टर घेऊन हवन करताना दिसत आहेत. तसेच, देवाकडे त्यांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी आशीर्वादही मागत आहेत.

दोन्ही संघ शानदार फॉर्ममध्ये
वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ शानदार फॉर्ममध्ये आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाविरुद्ध विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने नेदरलँड्स आणि श्रीलंकेला पराभूत केले होते. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाबर आझम (Babar Azam) यांचे लक्ष विजयाची हॅट्रिक करण्यावर असेल. (wc 2023 12th match ind vs pak fans outside narendra modi stadium see video)

हेही वाचा-
‘मी त्याला KL Rahul म्हणत नाही…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी दिग्गजाचे राहुलबाबत मोठे विधान
पाकिस्तानविरुद्ध ‘एवढ्या’ धावा करताच विराट घडवणार इतिहास, बनेल असा पराक्रम करणारा दुसराच भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---