Mohammed Shami on INDvsAUS Final: विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार प्रदर्शनाने सर्वांना आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवाला आठवडा झाला आहे, पण वेदना अजूनही कायम आहेत. अशात मोहम्मद शमी याने अंतिम सामन्याविषयी मोठे विधान केले आहे.
शमीचे लक्षवेधी भाष्य
विश्वचषक 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) म्हणाला की, स्पर्धेत सलग 10 सामने जिंकून संघ विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात (World Cup 2023 Final) पोहोचला होता. सर्व खेळाडू पूर्णपणे फिट होते, पण तो दिवस आमचा नव्हता. तो असेही म्हणाला की, जर धावफलकावर 300 धावा (Mohammed Shami 300 Runs) असत्या, तर सामन्याचा निकाल वेगळा असता.
‘जर 300 धावा झाल्या असत्या, तर…’
माध्यमांशी बोलताना शमी म्हणाला, “आम्ही सलग 10 सामने जिंकलो. खेळाडूंचे मनोबल कमी होईल, अशी कुठलीच गोष्ट नव्हती. फक्त तो दिवस आमचा नव्हता. दवामुळे खेळपट्टी संथ होते. तसेच, वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली नाही. हेदेखील एक प्रमुख कारण राहिले. मोठ्या सामन्याचा कोणताही दबाव नव्हता. आम्ही मोकळ्या डोक्याने आपल्या लयीत खेळत होतो. दिवस-रात्र सामन्यात नेहमीच सायंकाळी फलंदाजी चांगली होते. खेळपट्टी संथ होते. जर 300 धावा बनवल्या असत्या, तर निकाल वेगळा असता.”
पहिल्या चार सामन्यात न खेळण्याविषयी बोलताना शमी म्हणाला, “आम्हाला फक्त विजय महत्त्वाचा होता. सर्वजण चांगली कामगिरी करत होते. मला संधी मिळाली, तेव्हा मी संघासाठी शानदार काम केले.” तसेच, शमीला मिचेल मार्शच्या ट्रॉफीवर पाय ठेवण्याविषयी विचारले गेले. यावेळी तो म्हणाला की, “जर हे खरं असेल, तर नक्कीच वेदनादायी आहे. जी गोष्ट डोक्यावर ठेवतात, त्यावर पाय ठेवले आहेत. असे करायला नको होते.”
शमीची धमाल
मोहम्मद शमी विश्वचषक 2023 (Mohammed Shami World Cup 2023) स्पर्धेच चांगलाच चमकला. त्याने फक्त 7 सामन्यात 10.70च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमीने सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये 3 वेळा एका डावात 5 विकेट्स आणि 1 वेळा एका डावात 4 विकेट्सचाही समावेश होता. 57 धावा खर्चून 7 विकेट्स ही शमीची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. (wc 2023 most wicket taker mohammed shami on the defeat in the world cup final against australia said this read here)
हेही वाचा-
Complaint filed against Mitchell Marsh: मार्शला वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणे भोवणार! पोलिसात गेलं प्रकरण
Mitchell Marsh WC Trophy Controversy: मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमीनेही काढला राग; म्हणाला, ‘ज्यासाठी संघ…’