Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘भारताने कार्तिकच्या जागी पंतला खेळवले पाहिजे’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिला फुकटचा सल्ला

November 4, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant-And-Dinesh-Karthik

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. भारताने या स्पर्धेत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने आपल्या खिशात घातले आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य सामन्याचे तिकीट पक्के करावे लागेल. अशातच आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी रिषभ पंत याच्या जागी दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान देण्याबद्दल आपले मत मांडले आहे.

इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी माध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलिया संघात टीम डेविड याच्या निवडीवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, “टीम डेविडने आंतरराष्ट्रीय पातळीवर काय केले आहे? कधी-कधी निवडकर्ते देशांतर्गत फॉर्मच्या आधारावर खेळाडूंना निवडतात आणि मला वाटते की, भारत याचे ज्वलंत उदाहरण आहे. भारत रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या जागी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला खेळवत आहेत. मला वाटते की, रिषभ पंत याला प्रत्येक सामन्यात खेळवले पाहिजे होते.”

खरं तर, दिनेश कार्तिक याने मागील काही काळापासून भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. त्याने अनेक सामन्यात मॅच विनिंग खेळी साकारल्या आहेत. दुसरीकडे, रिषभ पंतला संघात अनेक संधी देण्यात आली होती, पण तो सतत फ्लॉप ठरत होता. त्याला भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात खेळण्याची संधी दिली होती, पण तिथेही तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघाकडून 4 सामन्यात खेळता आले नाही. मात्र, आता आगामी सामन्यात रिषभ पंतला संघात स्थान मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिनेश कार्तिकच्या या विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 1, 6 आणि 7 धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो धावबाद होऊन 7 धावांवर तंबूत परतला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्डकपमध्ये केन विल्यमसनचीच कॅप्टन्सी भारी! इतिहासात तीन वेळा संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री
आयर्लंडला लोळवत न्यूझीलंडची थाटात सेमी-फायनलमध्ये एन्ट्री! कॅप्टन केनची शानदार कामगिरी


Next Post
Austrlia-Cricket-Team

राशिदची झुंज अपयशी! रोमांचक सामन्यात अफगाणिस्तान पराभूत; ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

sachin tendulkar

चहावाल्याचं भाग्य उजळलं! स्वतः सचिन तेंडुलकरने थांबवली गाडी, अर्जुनही होता सोबत

Gerard Piqué

बार्सिलोनाच्या जेरार्ड पिकेची अचानक निवृत्तीची घोषणा; दिला 14 वर्षाच्या कारकिर्दीला पूर्णविराम

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143