---Advertisement---

41व्या वर्षी डिव्हिलियर्सचा जलवा कायम! WCL मध्ये शतक ठोकून उडवला इंग्लंडचा धुव्वा

On: शुक्रवार, जुलै 25, 2025 6:54 AM
---Advertisement---

एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती शतकाच्या बळावर, दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025च्या आठव्या सामन्यात इंग्लंडचा 10 विकेट्सने पराभव केला. यासह, दक्षिण आफ्रिकेने हंगामात विजयाची हॅट्ट्रिक देखील पूर्ण केली. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी सामना बरोबरीत सुटल्यानंतर वेस्ट इंडिजला बॉल आउटमध्ये आणि भारताला 88 धावांनी (डीएसएल) पराभूत केले होते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकन संघाने 10 विकेट्स राखून केवळ 12.2 षटकांत ही धावसंख्या गाठली. डिव्हिलियर्सने 116 धावांची नाबाद खेळी केली, तर हाशिम अमलाने 29 धावा केल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान इंग्लंड संघ निर्धारित 20 षटकांत 6 विकेट्स गमावून केवळ 152 धावाच करू शकला. फिल मस्टर्डने संघाचा सर्वाधिक 39 धावा काढल्या. त्याच्याशिवाय, कोणताही इंग्लिश फलंदाज 25 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.

या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स संघाकडून एबी डिव्हिलियर्सने 41 चेंडूत शतक झळकावले. त्याने एकू 51 चेंडूत 15 चौकार आणि 7गगनचुंबी षटकारांसह 116 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या हाशिम अमलाने 25 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने WCL पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. संघाच्या खात्यात 6 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट देखील 3 च्या वर आहे.

ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेसह टॉप-२ मध्ये कायम आहे. त्यांचे 2 सामन्यात 3 गुण आहेत. लेजेंड्सच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. भारत 1 गुणासह तळाशी सहाव्या स्थानावर आहे. टॉप-4 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---