---Advertisement---

स्टोक्सचा खेळ पाहून कर्णधार रुटही झाला हॅंग, दिले खास टोपण नाव

On: मंगळवार, जुलै 21, 2020 9:58 PM
---Advertisement---

मॅनचेस्टर। इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने बेन स्टोक्सची प्रशंसा केली आहे. त्याने म्हटले की स्टोक्स इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू आहे. याबरोबरच रूटने त्याला टोपण नाव देत म्हटले, की तो ‘मिस्टर इनक्रेडिबल’ असून त्याच्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सच्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडने ११३ धावांनी सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधल्यानंतर रूटने स्टोक्सचे कौतुक केले आहे. स्टोक्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोलाची कामगिरी करत पहिल्या डावात १७६ धावा, तर दुसऱ्या डावात ७८ धावा कुटल्या होत्या.

स्टोक्सने (Ben Stokes) फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याबरोबरच गोलंदाजी करतानाही त्याने सामन्यात ३ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

सामन्यानंतर रूट (Joe Root) म्हणाला, “मला वाटते सर्वांना हे माहित आहे की आपण सर्व अशा एका खेळाडूला पहात आहोत, जो सध्या जागतिक क्रिकेटमध्ये यशाच्या शिखरावर आहे. तो सातत्याने वेळोवेळी त्याचे योगदान देत आहे. आपल्याला त्याला सांभाळायला हवे, त्याचे कौतुक करायला हवे आणि आपल्याला समजले पाहिजे की आपल्याकडे एक महान खेळाडू आहे आणि आपण त्याचे जास्त शोषण करू नये.”

स्टोक्सची तुलना कार्टून सुपरहीरो ‘मिस्टर इनक्रेडिबल’शी करत रूट म्हणाला, की कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची स्टोक्सची क्षमता त्याला संघासाठी मौल्यवान बनवते. तो पुढे म्हणाला, “खरंतर तो अष्टपैलू आहे, जे तुम्हाला जागतिक क्रिकेटमध्ये अधिक पहायला मिळणार नाहीत. तो असा खेळाडू आहे, जो कोणत्याही वेळी खेळ पलटवू शकतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-कुणी काहीही म्हणो, पंतने आपल्या खेळात बदल करायला नको!

-प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला

-ब्रेकिंग- ठरलं तर! आयपीएल २०२० होणार, ती देखील या देशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---