पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या मते भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या संघाला श्रीलंकेतील परिस्थितीचा अधिक फायदा मिळेल. श्रीलंकन खेळाडू मागच्या काही महिन्यांपासून श्रीलंकेत सतत खेलत आहेत, ज्याचा पायता संघाला मिळेल, असे बाबर वाटते. आशिया चषकाच्या सुपर पोरमध्ये भारत आणि पाकिस्तान रविवारी (10 सप्टेंबर) भिडणार आहेत. त्याआधी पत्रकार परिषदेत बाबरने प्रश्नांची उत्तरे दिली.
बाबर आझम याच्या मते पाकिस्तानचे अनेक खेळाडू जुलै महिन्यात कसोटी मालिकेनंतर श्रीलंकेत खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग खेळवली गेली, ज्यामध्ये हे खेळाडू खेळळे. सोबत अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका देकील याच ठिकाणी झाली. याच पार्श्वभूमीवर भारताच्या तुलनते श्रीलंकेतील परिस्थिती पाकिस्तानसाठी अनुकूल आहे, असे बाबरला वाटते.
सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत बाबर आझम म्हणाला, “आम्ही पाकिस्तान आणि श्रीलंकेत सतत खेळत आहोत. तुम्ही असे म्हणू शकता की, आम्हाला (श्रीलंका) त्यांच्यावर (भारत) फायदा मिळेल. मागच्या जवळपास दोन महिन्यांपासून आम्ही याठिकाणी खेळत आहोत. आम्ही कसोटी मालिका खेळली. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळील आणि लंगा प्रीमियर लीगही खेळली. त्यामुळे आम्ही फायद्यात आहोत, असे म्हणता येईल.” बाबरने पुढे आपल्या संघातील गोलंदाज चांगले प्रदर्शन करत असल्याचे सांगितले आणि मधल्या षटकांमध्ये विकेट्सची गरज असल्याचेही स्पष्ट केले.
“आम्ही चेंडूने चांगली सुरुवात केली आहे. मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचीच योगजा नेहमीच राहिली आहे. आम्ही त्या घेतल्या पाहिजेत, पण तसे होत नाहीये. पण आम्ही सामना चांगल्या पद्धतीने संपवत आहोत, जे तुम्ही पाहू शकता. जर एखादा अपयशी ठरला, तर दुसरा एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करत आहे,” असे बाबर म्हणाला.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमध्ये झालेला सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. रविवारी सुपर फोरमधील सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. असे असले तरी बाबर याबाबत चिंता करत नाहीये. पाकिस्तानी कर्णधाराच्या मते पाऊस आपल्या नियंत्रणात नसल्यामुळे त्यावर जास्त विचार करूनही फायदा नाही. संघातील खेळाडू या सामन्यासाठी जास्तीत जास्त सराव करत असल्याची माहिती देखील बाबरकडून मिळाली. (‘We are in the advantage…’, Babar Azam’s confidence was seen before playing against India)
महत्वाच्या बातम्या –
शुबमन गिलने वाचला बाबर आझमच्या कौतुकाचा पाढा; म्हणाला, ‘तो जागतिक दर्जाचा खेळाडू, आम्ही त्याला…’
“धोनी साक्षात देवासारखा!”, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सांगितला आयपीएलचा ‘तो’ अनुभव