भारतीय खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठीच फायदेशीर असते, अशी टीका करणाऱ्यांना फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच खेळपट्टीवर टीका करण्याआधी आपल्या मानसिकतेत बदल करावा असा सल्ला देखील दिला आहे.
सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांचा बोलबाला आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान खेळपट्टीबाबत अनेकांनी विविध मते मांडली आहेत. अनेकांनी खेळपट्टीवर टीकाही केली आहे. या सामन्यात आर अश्विन आणि भारतीय संघासाठी पहिलाच कसोटी खेळणारा अक्षर पटेल संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत.
पहिल्या डावात गोलंदाजी करतांना आरअश्विन याने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. तर अक्षर पटेल याने इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याला बाद केले होते. तसेच त्याला २ गडी बाद करण्यात यश आले होते.
अक्षर पटेल याने खेळपट्टीबद्दल भाष्य करणाऱ्यांना दिले चोख प्रत्युत्तर
इंग्लंड संघाचा पूर्व कर्णधार माईकल वॉन याने खेळपट्टीबद्दल भाष्य करताना, चेपॉक मैदानातील खेळपट्टी पूर्णपणे तयार नसल्याचे म्हटले होते. यावर अक्षर पटेल याने चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘जर तुम्ही खेळपट्टीबद्दल बोलत असाल तर मला नाही वाटत की कुठलाही चेंडू हेल्मेटला जाऊन धडकला आहे. चेंडू सामान्यरित्याच फिरत होता. आम्ही ( दोन्ही संघ ) एकाच खेळपट्टीवर खेळत आहोत आणि धावा सुद्धा करत आहोत. यामुळे मला नाही वाटत की कोणालाही या गोष्टीचा त्रास असेल.”
इंग्लिश मिडीयाला देखील दिले ताबडतोड उत्तर
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्तीनंतर अक्षर पटेल म्हणाला, ” जेव्हा आम्ही परदेशात खेळण्यासाठी जातो, तेव्हा आम्ही जलद गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीबद्दल कधीच तक्रार नाही केली की खेळपट्टीवर गवताचे प्रमाण अधिक आहे. मला तर वाटते लोकांना खेळपट्टीबद्दल विचार करण्याऐवजी आपल्या मानसिकतेत बदल करावा लागेल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे, अशात तुम्हाला जास्त काही करायची आवश्यकता नाही आहे. जेव्हा तुम्ही चेंडू फेकणार तेव्हा थोडा जोर लावून फेकला तेव्हा चेंडू फिरेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीमुळे ‘या’ दोन माजी दिग्गजांमध्येच जुंपले ट्विटर वॉर
काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…