भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात शुबमन गिल खेळणार की, नाही हा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे. कर्णधार रोहित शर्मा याने गिलला 99 टक्के फिट घोषित केले आहे. या सामन्यात शुबमन गिल जरी खेळला नाही, तरी भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकतो, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघात इतकी खोली आहे की, ते गिलला मिस करणार नाहीत.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) सुरू होण्यापूर्वी सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यूची लागण झाली होती, त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होऊ शकला नाही. चेन्नईत उपचार करून घेतल्यानंतर शुबमन भारतीय संघासोबत अफगाणिस्तान सामन्यासाठी दिल्लीला गेला नाही, तो थेट अहमदाबादला पोहोचला. तो आता हळूहळू डेंग्यूच्या तापातून बरा झाला असून भारत-पाकिस्तान सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात जेव्हा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा त्याने एका वाक्यात उत्तर दिले की, तो 99 टक्के खेळेल, बाकीचे आम्ही बघू.
आकाश चोप्राच्या (Aakash Chopra) मते, गिल जरी खेळला नाही, तरी भारतीय संघाला काही फरक पडणार नाही. त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना त्याने हे वक्तव्य केलं, तो पुढे म्हणाला, “आम्ही शुबमन गिलशिवायही पाकिस्तानचा सामना करू शकतो कारण आमचा संघ खूप चांगला आहे. इशान किशन (Ishan Kishan) हा जबरदस्त खेळाडू आहे, यात शंका नाही. तो सध्या गिलसारखा खेळू शकणार नाही, पण भविष्यात तो चमकदार खेळ करेल. मात्र, गिल उपलब्ध झाल्यास तो नक्कीच खेळेल.”
शुबमन गिलबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याचं संघात असणं भारतीय संघासाठी खूप महत्वाचं आहे. त्यातच सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागल्या आहेत. ()
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध भारताचा ‘हा’ गोलंदाज ठरेल गेमचेंजर; इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराला विश्वास
याला म्हणतात INDvsPAK सामन्याची क्रेझ! चाहत्यांनी स्टेडिअमबाहेर केली तुफान गर्दी, पाहा व्हिडिओ