बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात मुंबई संघ मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. अशात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बेंगलोरविरुद्धच्या पुढील सामन्यामध्ये आम्हाला संघात जास्त बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे.
रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई संघ ८ विकेट्सने पराभूत झाला होता. याविषयी बोलताना बुमराह म्हणाला की, “आम्ही आताही खूप आनंदी आहोत आणि मी स्पष्टपणे सांगतो की, आमच्या संघात कोणताही बदल करण्याची गरज नाही. त्यादिवशी राजस्थान संघाने आमच्यापेक्षा उत्कृष्ट प्रदर्शन केले. आम्ही त्यांच्या कामगिरीची प्रशंसा करुन पुढे जाणार आहोत.”
“यावर्षी आमच्याकडे खूप चांगले गोलंदाज उपलब्ध आहेत. ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिसन, एवढेच नव्हे तर नाथन कूल्टर नाइलसारखा गोलंदाजही आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्याच्या अंतिम षटकात आणि सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा फरक सांगताना बुमराहने म्हटले की, “मी खेळपट्टीची स्थिती, सीमारेषेचे अंतर अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन गोलंदाजीच्या पर्यायांची निवड करतो. पण पुढे फलंदाजी करणाऱ्या खेळाडूवरही हे निर्भर करते. आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही, तुम्हाला आता यॉर्कर टाकावा लागेल का हळूवार गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला गोलंदाजी करताना नेहमी सक्रिय राहावे लागते.”
बुमराहने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७.५२च्या इकोनॉमी रेटने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या ६ षटकांमध्येच गोलंदाजांचा धुव्वा उडवणारे विस्फोटक फलंदाज
जेवलीस का गं..? इशाऱ्यांद्वारे विचारपूस; गरोदर अनुष्काची मैदानावर असतानाही विराट घेतोय काळजी
“मी तर झोपलोच,” CSK विरुद्ध कोहली-डिविलियर्सची फलंदाजी पाहून माजी क्रिकेटरची मजेशीर प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे
…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !