मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.
हा विजय कॅप्टन कूल धोनीचा टी२० मधील कर्णधार म्हणून १५० वा विजय होता. टी२०मध्ये धोनी सोडून कोणत्याही कर्णधाराला १०० सामनेही जिंकता आले नाही.
तसेच धोनीने आयपीएलमधील तिसरे विजेतेपद आपल्या संघाला मिळवुन दिले. जेव्हा धोनी विजेतेपदाचा चेक घेतल्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांच्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी गेला तेव्हा मांजरेकरांनी त्याला विचारले की आज काय प्लॅन केला आहे?
यावर भावनिक होत धोनी म्हणाला, ” आम्ही सामना झाल्यावर उद्या चेन्नईला जाणार आहे. सामना आम्ही पराभूत झालो असतो तरी आम्ही चेन्नईला जाणार होतो. आम्ही चेन्नईमधील आमच्या चाहत्यांना तसेच जवळच्या मित्रांना भेटणार आहोत. आज आम्ही संघाच्या हाॅटेलमध्ये थोडफार सेलिब्रेशन करुन उद्या चेन्नईला रवाना होणार आहोत.”
यावेळी मैदानावर असलेल्या चाहत्यांनी धोनी-धोनीचा गजर सुरु केला होता.
चेन्नई सुपर किंग्ज हा या आयपीएलमधील एकमेव असा संघ ठरला ज्याला एकच सामना घरच्या मैदानावर खेळला आहे तर साखळी फेरीचे सामने पुण्याला खेळला.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!
–सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू
–म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन
–जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की
-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला