डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या उपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघ आता अधिक मजबूत वाटत आहे. पण चेतेश्वर पुजाराला भारताच्या गोलंदाजांवर देखील तितका अधिक विश्वास आहे की ते 2018-19 च्या कसोटी मालिकेतील यशाची पुनरावृत्ती करू शकतील.
2018-19 च्या मालिकेत पुजाराने तीन शतकी डावांच्या मदतीने 500 पेक्षा अधिक धावा केल्या आणि भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर प्रथमच कसोटी मालिका 2-1 ने जिंकून देण्यास मदत केली. तथापि स्मिथ आणि वॉर्नर त्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नव्हते. दोघांना चेंडू छेडछाड प्रकरणी निलंबित करण्यात आले होते.
‘ऑस्ट्रेलिया मजबूत तर भारतीय गोलंदाजी त्याहून भक्कम’
एका मुलाखतीत भारताच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने सांगितले की, ” 2018-2019 च्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ आता थोडा मजबूत असेल परंतु तरीही त्यांना विजय सोपा नाही. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तिघांनाही 2018-19 च्या यशाची पुनरावृत्ती करता येईल. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खूप त्रास सहन करावा लागेल.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पुजारा पुढे म्हणाला, ‘स्मिथ, वॉर्नर आणि मार्नस लब्यूशेन उत्तम खेळाडू आहेत यात शंका नाही. परंतु आमच्या सध्याच्या गोलंदाजांसाठी चांगली गोष्ट ही आहे की मागील मालिकेतील बहुतेकजण या मालिकेमध्ये खेळत आहेत.
पुजारा म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियामध्ये कसे यशस्वी व्हावे हे आमच्या गोलंदाजांना ठाऊक आहे कारण यापूर्वी त्यांनी तेथे यश मिळवले होते. त्यांच्याकडे खेळाची योजना आहे आणि जर आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मैदानावर उतरवले तर ते स्मिथ, वॉर्नर आणि लब्यूशेनला लवकर बाद करू शकतील.’
तो म्हणाला, “जर आम्ही त्या यशाची पुनरावृत्ती पुन्हा करू शकलो तर आम्हाला कसोटी मालिका जिंकण्याची संधी असेल.”
‘डे-नाईट टेस्ट खेळणे एक आव्हान असेल’
कसोटी मालिकेचा पहिला सामना डे-नाईट असेल जो एडलेडमध्ये खेळला जाईल. 18 शतकांसह 77 कसोटीत 5840 धावा करणाऱ्या पुजारा सारख्या अनुभवी फलंदाजा समोरही संध्याकाळी खेळण्याचे आव्हान असेल. भारतीय संघाकडे बांगलादेशविरुद्ध डे-नाईट टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे.
यावर पुजारा म्हणाला, ‘हे एक वेगळंच आव्हान असेल कारण येथे गुलाबी चेंडूसह वेगळ्या पद्धतीची गती आणि बाउंस असेल. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी कुकाबुराशी खेळणार आहोत. परदेशात भारतीय संघाच्या पहिल्या डे-नाईट सामन्यात खेळण्याच्या आव्हानाला सर्वाना एकत्रितपणे सामोरे जावे लागेल.’
पुजारा म्हणाला, ‘एक संघ म्हणून आणि एक खेळाडू म्हणून गुलाबी चेंडू आणि लाईट्सवर खेळण्याचा सरावही असायला हवा. यासाठी थोडा वेळ लागतो.’
‘तुम्ही स्वतःहून सामने जिंकू शकत नाही. होय, पण तुम्ही चांगले प्रदर्शन करू शकता. परंतु जिंकण्यासाठी आपल्याला इतर खेळाडूंच्या समर्थनाची आवश्यकता आहे. शेवटच्या मालिकेतही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती,’ असे पुजारा म्हणाला.
कसोटी जिंकण्यासाठी 20 बळी आवश्यक
पुजारा म्हणाला, ‘कसोटी जिंकण्यासाठी तुम्हाला 20 बळी घ्यावेच लागतात आणि आधीच्या मालिकेतही फक्त माझी कामगिरी नव्हती, तर इतर फलंदाजांनीही मला साथ दिली. हे संघाचे यश होते. जेव्हा संघ यशस्वी होतो तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो.’
या आव्हानात्मक मालिकेसाठी पुजाराने राजकोट येथील त्याच्या अकादमीमध्ये वडिलांच्या आणि प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली सराव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाणच्या आयपीएल २०२० संघातून विराट- रोहितला डच्चू, ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय खेळाडूंची अनोखी युक्ती, करतायेत टेनिस बॉलने सराव, पाहा व्हिडिओ
…तर स्मिथला कर्णधार म्हणून नेमण्यासाठी फार उशीर होईल, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…