भारतीय संघाचा इंग्लंड दौरा मंगळवार, ३ जुलैपासून टी-२० सामन्यांच्या मालिकेने सुरु होत आहे.
याच पार्शवभूमीवर इंग्लंडचा टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार इऑन मॉर्गनची सोमवार, २ जुलैला पत्रकार परीषद झाली.
यावेळी इंग्लंड संघाने भारतीय कर्णधार कोहलीला रोखण्यासाठी खास योजना आखल्या असल्याचे इऑन मॉर्गनने सांगितले. मात्र त्या योजना काय आहेत हे सांगण्यास मॉर्गनने नकार दिला.
“हा चांगला प्रश्न आहे. आमच्याकडे विराट कोहलीला रोखण्यासाठी खास योजना आहेत मात्र त्या मी इथे त्या उघड करणार नाही”,असे इंग्लिश कर्णधार मॉर्गन विराट विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
भारतीय संघाच्या या दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष आहे. कारण २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधार कोहली अपयशी ठरला होता.
तसेच इऑन मार्गनला भारतीय युवा फिरकी जोडी चहल-कुलदीप यादव यांना कसे सामोरे जाणार असा प्रश्न विचारल्यावर त्याने या जोडीबद्दल भाष्य करण्याचे टाळले.
“ज्यावेळी तुम्ही चांगल्या संघाविरुद्ध खेळत असता त्यावेळी एक किंवा दोन खेळाडूंचा विचार करून चालत नाही. देशांतर्गत क्रिकेटची चांगली पार्श्वभूमी असलेला भारतीय संघ सगळ्याच क्षेत्रात सरस आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण भारतीय संघाचा विचार करून योजना आखतोय.” असे म्हणत मॉर्गनने चहल-कुलदीप यादवला जास्त महत्व देण्याचे टाळले.
पुढे मॉर्गनने इंग्लंडसमोर तगड्या भारतीय संघाचे मोठे आव्हान असल्याचेही कबूल केले.
महत्त्वाच्या बातम्या-
– कर्णधार कोहली म्हणतो, आम्हाला कमी समजणं इंग्लंडला महागात पडू शकत
-ब्लाॅग: आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये आशियायी क्रिकेटर्सची उपेक्षाचं?