इंडियन प्रीमियर लीगच्या १४ हंगामाचा इतिहास पाहिला तर, मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज ४ वेळा जेतेपद पटकावत आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ राहिला आहे.
दरम्यान आयपीएल २००८ मध्ये विजेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. मागील ३ हंगामात राजस्थान संघाचे प्रदर्शन अतिशय सुमार राहिले आहे. मात्र राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक (Rajasthan Royals Head Coach) आणि क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांना अपेक्षा आहे की, यंदाचा संघ खूप सक्षम आहे.
संगकारा (Kumar Sangakkara) म्हणाला की, “आम्हाला माहिती आहे की, आम्हाला सराव सत्रात आमच्या संघावर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण मला वाटते की, आम्ही त्या विभागांची ओळख करण्यात यशस्वी राहिलो आहोत, ज्यावर लक्ष देण्याची गरज होती. आम्ही मेगा लिलावात खेळाडूंची निवड करण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन केले. आम्ही आमच्या ठरलेल्या मापदंडांना पूर्ण करण्यात यशस्वी राहिलो आहोत. मला वाटते की, आम्ही मजबूत संघ निवडून शानदार काम केले आहे.”
संघ संयोजनाबद्दल कुमार संगकारा म्हणाला…
पुढे संघ संयोजनाबाबत बोलताना संगकारा म्हणाला की, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आर अश्विन (R Ashwin) यांची उपस्थिती संघात मोठे अंतर निर्माण करेल.
संगकारा म्हणाला की, “चहल आणि अश्विनच्या रूपात लेग स्पिन आणि ऑफ स्पिन टाकणारे २ सर्वश्रेष्ठ स्पिनर आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्याकडे ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, नाथन कुल्टर नाइल, ओबेय मॅककॉय यांच्या रूपात मजबूत वेगवान गोलंदाजी क्रम आहे. त्यांची साथ देण्यासाठी यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि जोस बटलर आहेत, ज्यांना आम्ही रिटेन केले आहे. आमच्याकडे प्रत्येक विभागामध्ये खोली आहे. जेम्स नीशम, मिशेल आणि रासी वॅन डर डूसेन उमदा क्रिकेटपटू आहेत. आमच्याकडे बरेच चांगले युवा भारतीय क्रिकेटपटूही आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, आमचा संघ खूप सक्षम (Competent Squad) आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ११ वर्षांनंतर केकेआरविरुद्ध आयपीएल उद्घाटनाचा सामना खेळणार सीएसके, पाहा उभयंतांचे आकडे
नशिबाची साथही इंग्लंडलाच! स्टंप्सला बॉल लागूनही नाही पडल्या बेल्स, इथेच लिहीला गेला भारताचा पराभव
वॉर्नरने हातोड्याने कराचीच्या खेळपट्टीवर घेतली मेहनत; पत्नी ट्रोल करत म्हणाली, ‘तू घरीही अशीच…’