रविवारी (20 डिसेंबर) पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड संघाचा गोलंदाज टीम साउदीने 4 विकेट्स घेतल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन (57)आणि टीम सेफर्ट (84) या दोघांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने हा सामना 19.2 षटकात 9 विकेट्सने जिंकला.
सामान्यांनंतर विलियम्सन म्हणाला,”मी आपण आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. हे 10 दिवस भावनिक होते. आपण जेवढे शक्य आहे तितके भूमिका निभावण्याचा प्रयत्न करा. सोबतचे खेळाडू खुप चांगले खेळले. आम्हाला माहित आहे, पाकिस्तान संघ किती मजबूत आहे. वास्तवात विजय आनंददायक राहिला.”
केन विल्यम्सने यष्टीरक्षक फलंदाज सेफर्ट याचे कौतुक करताना म्हणाला, “सेफर्टने शानदार खेळी केली, चेंडू सोबत वास्तविकपणे त्याने चांगले प्रयत्न केले. गोलंदाजी साठी चांगले वातावरण होते आणि तुम्ही भागीदारी सुद्धा करू शकता. आम्ही धावांचा पाठलाग करत होतो आणि काही विकेटने आम्हाला अडचणी निर्माण केल्या. सेफर्ट चहूकडे फटके मारत होता, त्याने दबाव कमी केला. आम्हाला त्याच्या खेळण्याची गुणवत्ता माहित आहे. आम्ही पुढच्या सामन्यात आणखी चांगली सुधारणा करू. ”
पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना हाफिजने केलेल्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 6 विकेट्स गमावून 163 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टीलने 21 धावांची खेळी करताना सेफर्ट सोबत पहिल्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर केन विलियम्सने 42 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 57 धावांची खेळी केली, त्याचबरोबर सेफर्टने 63 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 3 षटकार लगावत नाबाद 84 धावा केल्या आणि संघाला 19.2 षटकात विजय मिळवून दिला.
टीम साउदीची दमदार कामगिरी
या सामन्यात टीमने उत्तम गोलंदाजीचा नजारा सादर करताना 4 षटकात 21 धावाच दिल्या आणि त्याने 5.2 च्या इकॉनॉमीने 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जिमी निशम आणि इश सोधीने प्रत्येकी एक विकेट घेत संघाच्या विजयात योगदान दिले त्यामुळे न्यूझीलंड संघाने या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय सलामीवीर मुरली विजयची ‘या’ मोठ्या स्पर्धेतून माघार, जाणून घ्या कारण
विराट कोहलीच्या कोचला दिल्ली क्रिकेटमध्ये मिळाली ‘मोठी’ जबाबदारी
पृथ्वी शाॅने सोडले मौन; सोशल मीडियावरून टीकाकारांना दिले उत्तर