मुंबई सिटी एफसीच्या चाहत्यांना मागील दोन वर्षांत त्यांच्या संघाचा जयजयकार करणासाठी स्टेडियममध्ये जाता आले नव्हते. २०२०-२१ मध्ये मुंबई सिटी एफसी लीग शिल्ड आणि ट्रॉफी जिंकून दुहेरी कामगिरी करणारा हिरो आयएसएलच्या इतिहासातील पहिला क्लब बनला होता. पण, पुढील हंगामात मुंबई सिटी एफसीला अव्वल चौघांत प्रवेश करता आला नाही. परंतु, मुंबई सिटी एफसीच्या चाहत्यांसाठी, दोन वर्षांच्यानंतर स्टँडवर परतणे हा भावनिक अनुभव होता. भारतीय फुटबॉल चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.
“आम्ही खूप भावूक होतो कारण हा क्षण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. आम्ही हे सुनिश्चित केले की आम्ही स्वतःला कधीही मागे ठेवले नाही. आम्ही फक्त खात्री केली की, खेळाडू आणि प्रशिक्षकांना हे माहित असायला हवे की चाहते इथे आहेत. चाहत्यांसमोर खेळण्यासाठी जेवढे ते आतुर होते, तेवढेच आम्हाला घरच्या मैदानावर त्यांना खेळताना पाहायचे होते,” असे मुंबई सिटी एफसीचा चाहता आनंद म्हणाला.
जयघोष, टीम बसचे स्वागत हे मुंबई सिटी एफसी खेळाचे सर्व ट्रेडमार्ड आहेत. यावेळी चाहते एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत स्टेडियममध्ये कूच करून सेलिब्रेशन करत आहेत. “मुंबई फुटबॉल एरिना लहान स्टेडियम आहे, खेळपट्टी जवळ आहे. त्यामुळे तुम्ही सामना जवळून पाहू शकता. त्यामुळे जयघोष करणे सोपं होत आहे. घरच्या मैदानावर दोन सामने जिंकण्याचा प्रवास खूप छान होता. ते शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे,” असेही आनंद म्हणाला.
”गेल्या काही वर्षांत आयएसएल आणि मुंबई सिटीने केलेल्या चाहत्यांची गुंतवणुक खूप मोठी आहे. एक फुटबॉल चाहता म्हणून माझा अनुभव वर्षानुवर्षे वाढला आहे. निकालाची पर्वा न करता प्रत्येक सामन्यानंतर माझी ओढ वाढत गेली. गेल्या काही वर्षांत, माझी ती कट्टर बाजू असण्याच्या दृष्टीने, आयएसएलने मदत केली आहे. चाहत्यांना क्लबशी जोडण्यात मुंबई सिटी एफसीचा मोठा वाटा आहे. स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रत्येक चाहत्याला तो अनुभव मिळत आहे जो त्यांना मिळायला हवा”, तो पुढे म्हणाला.
आयएसएल फॅन क्लबचे एक निश्चित वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक शहराच्या स्थानिक भावनांचा अंतर्भाव केला आहे आणि भारतीय फुटबॉलला अनोख्या शैलीत साजरे करण्याची परवानगी दिली आहे. आनंद म्हणाला की मुंबई सिटी एफसीच्या चाहत्यांची भावना या स्वीकृतीवर आधारित आहे आणि ते खेळाडूंनाही लागू होते. आनंद म्हणाला, “भारताच्या विविध भागांतून लोक मुंबईत येतात आणि ते आपले म्हणून स्वीकारतात. तुम्ही मुंबईसाठी खेळत असाल तर तुम्हाला शहराची संस्कृती समजून घेणे आवश्यक आहे. मुंबईची संपूर्ण आभा आणि उर्जा ही संपूर्ण चाहत्यांच्या मनात आहे कारण आम्ही फक्त मुंबई शहराचे चाहते नाही, आम्ही प्रथम मुंबईकर आहोत, जे मुंबई जगतात आणि श्वास घेतात. त्यामुळे जर आम्ही शहरातील एखाद्या संघाला पाठिंबा देणार आहोत, तर आम्ही मुंबईकरांची भावना स्टँडमध्ये व्यक्त करतो.”
मुंबई सिटी एफसी आता एफसी गोवाचे यजमानपद भूषवत आहे. मुंबई सिटी एफसी सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि हंगामाच्या या टप्प्यावर एकमेव अपराजित संघ आहे. (‘We were very emotional, we wanted to see them play at home’ – Mumbai City FC fan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलने लग्नासाठी बीसीसीआयकडे मागितली सुट्टी! अथियासोबत ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ
बीसीसीआयने केली सल्लागार समितीची निवड, सदस्यांमध्ये ‘या’ माजी खेळाडूंचा समावेश