आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. जवळपास २ वर्षे चालेल्या या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अधिराज्य गाजवले. परंतु अंतिम सामन्यात त्यांना न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एजेस बाउल येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. भारतीय संघाला पराभूत होताना पाहून कोट्यावधी चाहत्यांचे मन दुखावले आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाने ट्विट करत भारतीय संघाला धीर दिला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामान्याचा निकाल सहाव्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी लागला. शेवटच्या दिवसापर्यंत अंदाज लावता येत नव्हता की, कोणता संघ या सामन्यात बाजी मारेल. परंतु न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी आपल्या धारदार आणि वेगवान गोलंदाजीने भारतीय संघाला अडचणीत टाकण्याचे काम केले. यानंतर चहूबाजूंनी भारतीय संघावर टिका केली जात आहे.
मुंबई इंडियन्स संघाने ट्विट करत दिला
परंतु मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “तुम्ही भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरे करण्याचे अनेक क्षण दिले आहेत. अंतिम फेरीच्या प्रवासात तुम्ही अनेकदा जोरदार पुनरागमन केले आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आपण जोरदार पुनरागमन करू.” (we will comeback stronger, mumbai indians tweet after indian team loose final against new zealand)
Chin up, #TeamIndia. We’ll be back. Stronger than ever before 💪
You gave everyone back in India many moments to celebrate including all the epic comebacks and victories during the journey to this final. We are proud of you! 🇮🇳#OneFamily #WTC21 #ICCWTCFinal #INDvNZ @BCCI pic.twitter.com/n5EOQRpM2Y
— Mumbai Indians (@mipaltan) June 23, 2021
फलंदाजाना आले अपयश
पहिल्या डावात २१७ धावा करणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १७० धाव करण्यात यश आले होते. यामध्ये रिषभ पंतने सर्वाधिक ४१ धावांचे योगदान दिले. तर रोहित शर्माने ३० धावांचे योगदान दिले होते. तसेच कर्णधार कोहलीला दुसऱ्या डावात मोठ्या धावा करण्यात यश आले नाही. विराट अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. तसेच भारतीय संघाची भिंत मानल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला दोन्हीही डावात धावा करता आल्या नाही. त्याला पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात अवघ्या १५ धावा करता आल्या.
न्यूझीलंड संघाला विजय मिळवून देण्यात काइल जेमिसनने मोलाचे योगदान दिले. त्याने दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले. याच कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण
पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी