---Advertisement---

भारतीय सेना असे उत्तर देईल की पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही-वीरेंद्र सेहवाग

On: शुक्रवार, मे 9, 2025 8:21 AM
---Advertisement---

पाकिस्तान देश भारताविरुद्ध त्यांचे कट कारस्थान रचणे कधीही बंद करणार नाही. भारताद्वारे पाकिस्तानचे सर्व कट उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे पाकिस्तान भयभीत होताना दिसत आहे. त्यांनी भारतावर गुरुवार रोजी एका पाठोपाठ एक हल्ला केला. आता या तणावामध्ये टीम इंडियाचे माजी खेळाडू वीरेंद्र सहवाग यांनी पाकिस्तानवर घणाघात शब्दात सुनावले आहे. सहवाग यांनी पाकिस्तानला म्हटले आहे की, यावेळी भारतीय सेना पाकिस्तानला असे उत्तर देईल, की ते कधीही विसरू शकणार नाही.

सहवाग यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर लिहिले, पाकिस्तानने स्वतःच युद्धाचा मार्ग निवडला. कारण त्यांना शांत राहण्याची संधी मिळाली होती त्यांनी त्यांच्या दहशतवादी ठिकाणांना वाचवण्यासाठी युद्ध पेटवले आहे. जे त्यांच्या विषयी खूप काही बोलून जाते. भारत देशाची सेना त्यांना बरोबर असे उत्तर देईल, याचा विचार पाकिस्तान स्वप्नातही करू शकत नाही.

तसेच भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी सुद्धा पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, पाकिस्तान एक दृष्ट देश आहे पण पाकिस्तान कितीही दृष्ट असला तरी भारत त्यांना त्यांची जागा दाखवेल.

ऑलिंपिक पदक विजेती पी व्ही सिंधूने सैनिकांचे मनोबल वाढवले. त्यांनी भारतीय सशस्त्र सैनिकांचे आणि महिलांचे धाडसाबद्दल भाष्य केले.

याआधी टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरने असं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे चर्चा होत होत्या. अंबाती रायडूने ट्विट केले होते की, “युद्धाच्या बदल्यात युद्धच”त्यांची ही पोस्ट भारतीयांना आवडली नाही. एका युजरने त्यांना ट्वीट लगेचच डिलीट करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---