आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात होता. मात्र, भारतीय संघाने शानदार सुरुवात केल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने दिवसाचा पुढील खेळ होऊ शकला नाही. अखेर हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (11 सप्टेंबर) खेळला जाईल. मात्र, या राखीव दिवशी कोलंबोतील हवामान कसे असेल हे आपण जाणून घेऊया.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली. मात्र, अर्धशतके केल्यानंतर ते बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने डाव पुढे नेला. मात्र, त्यानंतर पाऊस आला आणि पुढे खेळ होऊ शकला नाही. सामना रात्री 9 वाजता सुरू होऊन 34-34 षटकांचा खेळ होणार होता. परंतु पुन्हा एकदा पाऊस पडला आणि सामना राखीव दिवशी गेला.
कोलंबोतील वातावरणाचा विचार केल्यास, सोमवारी सकाळी आकाश निरभ्र राहील. दुपारी पाऊस होण्याची शक्यता अगदी कमी आहे. मात्र, सायंकाळच्या सत्रात पावसाचे आगमन होऊ शकते. तसेच जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. अगदी रात्री देखील जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे हा सामना पूर्ण होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे असेल.
हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल. भारतीय संघ अद्याप 25.5 षटके फलंदाजी षटके करणे बाकी आहे. त्यामुळे भारतीय संघ आपली पूर्ण फलंदाजी करू शकतो. मात्र, पाकिस्तान संघाला यावेळी देखील विनाफलंदाजी अथवा कमी षटके फलंदाजीत करण्यास मिळू शकते. उदय संघातील साखळी करतील सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आलेला.
(Weather Forecast In Colombo On 11 September INDvPAK Match On Reserve Day)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
आशिया कपमध्ये पाऊस आणि ट्रोल होतायेत जय शाह! काय आहे कारण?