भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा बोलबाला होता. तर दुसरीकडे श्रीलंका संघातील खेळाडू संघर्ष करताना दिसून आले होते. पहिल्याच वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा वनडे सामनाही जिंकत भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर श्रीलंका संघ जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
दुसरा वनडे सामना आज (२० जुलै) प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा निर्माण होऊ शकतो की नाही?. चला तर घेऊया, कोलंबोतील वातावरणाचा आढावा.
कसे असेल दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वातावरण?
मालिकेतील दुसरा वनडे सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना असणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, सामना सुरू असताना जोरदार पाऊस पडेल. परंतु असे काही झाले नव्हते. हा सामना व्यवस्थितपणे पार पडला होता. तसेच मंगळवारी (२० जुलै) पाऊस येण्याची कुठलीही शक्यता वर्तवली गेली नाही. परंतु सामना सुरू असताना ढगाळ वातावरण असू शकते. तसेच तापमान २८ ते ३० डिग्रीपर्यंत असेल तर आद्रता ६९ टक्क्यांपर्यंत राहील.(Weather report of 2nd odi between India vs Srilanka)
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने मिळवला होता विजय
पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या इशान किशनने ५९ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. यासोबतच भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
असा आहे भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार (उप कर्णधार), चेतन सकारिया, नवदीप सैनी
असा आहे श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.
महत्त्वाच्या बातम्या-
SLvIND: दुसरा वनडे जिंकत भारताला डबल फायदा, मालिकाही जिंकणार अन् पाकिस्तानलाही पछाडणार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शुबमनने बदलला ‘लूक’, पाहा फोटो
वेगवान गोलंदाजाचा बनला अव्वल फिरकीपटू, टी२०त २७ धावांवर ४ विकेट्स घेत विरोधकांना केले ढेर