---Advertisement---

डेव्हिड वॉर्नरने आयपीएल लिलावाआधीच केले या खेळाडूचे सनरायझर्स हैद्राबाद संघात स्वागत

On: मंगळवार, डिसेंबर 17, 2019 1:01 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने यावर्षी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतरही स्टार्कचा ऑस्ट्रेलिया संघातील सहकारी डेव्हिड वॉर्नरने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघात त्याचे स्वागत केले आहे.

वॉर्नरने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन स्टार्कशी हात मिळवतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वॉर्नर विल्यम्सनच्या शेजारी त्याच्या खांद्यावर हात टाकून उभा आहे.

या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘स्टार्क तूझे सनरायझर्स हैद्राबादमध्ये स्वागत आहे.’

Screengrab: Instagram/David Warner

वॉर्नरने ही पोस्ट गमतीचा भाग म्हणून टाकली आहे. कारण स्टार्कने आयपीएल 2020 न खेळण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. त्यामुळे त्याच्यावर उद्या होणाऱ्या आयपीएल लिलावात बोली लागणार नाही.

स्टार्कने आयपीएलमध्ये शेवटचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 2015 मध्ये सामने खेळले आहेत.

विल्यम्सन आणि वॉर्नर हे दोघेही आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादकडून खेळतात. या दोघांनीही या संघाचे नेतृत्वही केले आहे. विशेष म्हणजे वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैद्राबादने 2016मध्ये आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---