---Advertisement---

वेलिंग्टनमध्ये वादळ! विलियम्सनला जागेवर थांबताही येईना, टोप्या, हेल्मेट, चष्मे गेले उडून, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, मार्च 18, 2023 4:14 PM
New-Zealand-Cricket
---Advertisement---

सध्या श्रीलंका संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने दोन विकेट्सने जिंकला होता. अशात आता मालिकेतील दुसरा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. क्रिकेटचा खेळ नेहमी पाऊस किंवा खराब वातावरणामुळे थांबवला जातो आणि असेच काहीसे वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाले. वेलिंग्टनमध्ये उभय संघातील सामन्यादरम्यान इतक्या वेगाने वारा वाहू लागला की, सामना थांबवण्याची वेळ ओढवली.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (New Zealand vs Sri Lanka) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सामन्यात आलेलं वादळ दिसत आहे. ही घटना न्यूझीलंडच्या डावादरम्यान घडली. यावेळी स्ट्राईकवर केन विलियम्सन (Kane Williamson) होता. त्याचवेळी अचानक वेगाने हवा आली आणि न्यूझीलंडचा हा दिग्गज फलंदाज हवेच्या जोरामुळे क्रीझवरून बाजूला झाला.

वेलिंग्टनमध्ये आलं वादळ
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजीदरम्यान विलियम्सन स्ट्राईकवर आला होता. जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला, तेव्हाच मैदानात जोरात वारा वाहू लागला. हवा इतकी जोरात होती की, तो जागेवरून बाजूला गेला. इतकेच नाही, तर इतर खेळाडूंच्या टोप्या आणि चष्मे हवेत उडाले. पंचांनाही मैदानात उभे राहण्यास त्रास होत होता. विशेष म्हणजे, स्टंप्सवरून बेल्सही खाली पडलेल्या. त्या लावण्यासाठी पंचांना त्रास होत होता. त्यामुळे हा सामना थांबवावा लागला होता.

https://www.instagram.com/reel/Cp4GBjEO3MR/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

पहिल्या दिवसाचा खेळ वेलिंग्टनमधील वातावरण खराब झाल्यामुळे उशिरा सुरू झाला. तसेच, वादळामुळे खेळपट्टीही ओली झाली होती. पहिल्या सत्राचा खेळ ओल्या मैदानामुळे रद्द झाला. त्यानंतर मैदान खेळण्यासारखे झाले, तेव्हा नाणेफेक श्रीलंकेने जिंकली आणि न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. यजमानांनी पहिल्या दिवसाची सुरुवात दणक्यात केली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात दोन खेळाडूंनी द्विशतके झळकावली. त्यात केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स (Henry Nicholls) यांचा समावेश होता. विलियम्सनने 291 धावा केल्या, तर निकोल्सने नाबाद 200 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला डाव 4 विकेट्स गमावत 580 धावांवर घोषित केला.

श्रीलंका संघ पहिला डाव खेळत आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 2 विकेट्स गमावत 26 धावा केल्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) 16 , तर प्रबत जयसूर्या हा 4 धावांवर नाबाद आहेत. (wellington storm new zealand vs sri lanka 2nd test bells and helmet video viral)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---