भारतीय महिला क्रिकेट संघाने गेल्या आठवड्यात आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन प्रथमच विजेतेपद जिंकण्याची संधी गमावली. परंतु, अंतिम सामन्यात पराभूत होण्यापूर्वी हरमनप्रीत कौरच्या संघाने गटातील चारही सामने जिंकले होते. तर, उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे वाया गेल्याने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
यानंतर भारतीय महिला संघ काही दिवसांपुर्वी मायदेशात परतला आहे. परंतु या संघाचे कौतूक करायला विमानतळावर कुणीही आले नव्हते. तसेच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्येही कुणीही उपस्थित नव्हते.
असे असले तरी पश्चिम बंगाल शासनाने मात्र आपल्या राजाच्या लाडक्या क्रिकेटपटू दिप्ती शर्माचा यथोचित सन्मान केला आहे.
टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी केल्यामुळे भारताची फिरकीपटू गोलंदाज दिप्ती शर्माला पश्चिम बंगालच्या क्रिडा मंत्रालयाने सन्मानित केले आहे.
दिप्तीने ट्वीट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. यावेळी ती म्हणाली, या सन्मानासाठी मी पश्चिम बंगालचे क्रिडामंत्री अरुप विश्वास, माजी क्रिकेटपटू आणि क्रिडा राज्यमंत्री लक्ष्मी रतन शुक्ला आणि माजी हॉकी खेळाडू गुरबक्स सिंग यांना धन्यवाद देते.
दिप्तीपुर्वी भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू शिखा पांडे हिला एयर मार्शल एमएसजी मेनन यांनी सन्मानित केले होेते.
ट्रेंडिंग घडामोडी-
– क्रिकेटपासून दूर असलेला अश्विन चेन्नईकरांवरच भडकला
– टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
– क्रिकेटपासून दूर असलेला अश्विन चेन्नईकरांवरच भडकला