वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी आपला संघ घोषित केला आहे. उभय संघांतील ही दुसरी कसोटी 20 जुलैपासून त्रिनिदादमध्ये सुरू होणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 हंगामातील ही दोन्ही संघांची पहिलीच कसोटी मालिका आहे. भारतीय संघ संध्या या मालिकेत 0-1 अशा आगाडीवर आहे.
गुरुवारी (20 जुलै) जेव्हा दोन्ही संघ या मालिकेसाठी आमने सामने येतील, तेव्हा भारत मालिका जिंकण्यासाठी, तर वेस्ट इंडीज मालिकेत बरोबरी साधण्यासाठी खेळेल. मालिकेतील हा दुसरा आणि शेवटचा सामना असल्यामुळे निर्णायक असणार आहे. याच कारणास्तव वेस्ट इंडीजने आपल्या संघात युवा ऑफ स्पिनरला संधी दिली आहे, ज्याने अद्याप कसोटी पदार्पण केले नाहीये. हा फिरकीपटू आहे केविन सिंक्लेयन (Kevin Sinclair). मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडीजने एक डाव आणि 141 धावांनी गमावला होता. मालिका गमवायची नसेल, तर वेस्ट इंडीजला दुसरा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे.
वेस्ट इंडीज संघ व्यवस्थापनाने डॉमिनिकामध्ये पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारणाऱ्या बहुतांश संघावर विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. अष्टपैलू रेमन रिफरच्या जागी 13 सदस्यीय संघात केविन सिंक्लेयर याला स्थान दिले गेले आहे. रिफर भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत एकही विकेट घेऊ शकला नव्हता. फलंदाज म्हणून त्याने 13 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात 2, तर दुसऱ्या डावात 11 धावांचे योगदान त्याने संघासाठी दिले होते.
आता वेस्ट इंडीज संघासोबत सिंक्लेयर त्रिनिदादला जाईल. दुखापत झालेली असतानाही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. वेस्ट इंडीजचा कर्णधार क्रॅग ब्रँथवेट (Kraigg Brathwaite) याला सिक्लेयरमुळे गोलंदाजी विभागात अधिकचा पर्याय मिळतो. या 23 वर्षीय खेळाडूने यापूर्वी संघासाठी सात वनडे आणि सहा टी-20 सामने खेळले आहेत. वनडे विश्वचषक 2023 साठी नुकत्याच पार पडलेल्या क्वॉलिफायर सामन्यांमध्येही त्याने वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केले. मात्र, आपल्या संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरवू शकला नाही. (West Indies 13-member squad announced for the second Test against India)
दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेला वेस्ट इंडीज संघ –
क्रॅग ब्रँथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिस अथानाजे, तेजनारायन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, केमार रोच, केविन सिंक्लेयर, जोमेल वरिकन.
महत्वाच्या बातम्या –
धोनीच्या गॅरेजमध्ये आहेत एखाद्या शोरूमपेक्षा जास्त बाईक्स! समोर आला खास व्हिडिओ
एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांनी केली पदकांची लयलूट! एशियन गेम्स-ऑलिम्पिकसाठी उंचावल्या अपेक्षा