---Advertisement---

एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांनी केली पदकांची लयलूट! एशियन गेम्स-ऑलिम्पिकसाठी उंचावल्या अपेक्षा

---Advertisement---

बँकॉक येथे नुकतीच एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे शानदार प्रदर्शन राहिले. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. चीन व जपान यांच्यानंतर भारतीय संघ पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भारतीय पथकाने सहा सुवर्ण, बारा रौप्य व नऊ कांस्य पदके जिंकली. भारतीय संघाच्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केले.

बँकॉक येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दिवशीच अभिषेक पाल याने कांस्यपदक जिंकून देत भारताचे खाते खोलले होते. त्यानंतर भारतीय संघाने सातत्याने स्पर्धेत पदकांची रांग लावली.

या स्पर्धेत भारताने एकूण सहा सुवर्ण पदके आपल्या नावे केली. 100 मीटर हर्डल स्पर्धेत ज्योती याराजी, ट्रिपल जंपमध्ये अब्दुल्ला अबूबकरने, गोळाफेकपटू तजिंदरपालसिंग तूर, स्टीपलचेस धावक पारूल चौधरी, अजय सरोज याने दीड हजार मीटर धावणे व 4 बाय 4 मिश्र रिले गटाने भारतासाठी सुवर्णपदके जिंकली.

भारतासाठी रौप्य पदके जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये लांब उडीपटू शैली सिंग, सर्वेश कुशारे यांनी उंच उडी, मुरली श्रीशंकर याने लांब उडी, स्वप्ना बर्मनने हेप्टाथलॉन, प्रियंका गोस्वामी हिने वीस किलोमीटर चालणे, चंदा हिने महिलांच्या 800 मीटर धावणे, पारुल चौधरी 5000 मीटर धावणे, कृष्णकुमार पुरुष 800 मीटर, आभा खतुवा महिला गोळा फेक, डीपी मनू पुरुष भालाफेक, ज्योती याराजी महिला 200 मीटर व पुरूष रिले यांचा समावेश होता.

भारतासाठी कांस्यपदक जिंकलेल्यांमध्ये अभिषेक पाल पुरुष 10,000 मीटर धावणे, ऐश्वर्या मिश्रा महिला 400 मीटर धावणे, तेजस्विनी श्री शंकर पुरुष डेकेथलॉन, मनप्रीत कौर महिला गोळा फेक, तमिल्सरण संतोष कुमार पुरुष 400 मीटर हर्डल, विकास सिंग 20 किलोमीटर बॅक वॉक, अंकिता महिला 5000 मीटर धावणे, गुलबीर सिंग पुरुष 5000 मीटर धावणे व महिला रिले यांचा समावेश आहे.

(All Indian Asian Athletics Championship Medalist PM Modi Congratulate)

महत्त्वाच्या बातम्या-
आरंभ है प्रचंड! बेंगलोरमध्ये तयार होतेय वर्ल्डकपसाठीची टीम इंडिया

रोहितने दिलेल्या सल्ल्यामूळे बदलले तिलक वर्माचे करियर! लहानपणीच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---