वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १० जूनपासून ग्रास आयलेट येथे सुरुवात होत आहे. या सामन्यासह दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला देखील सुरुवात करतील. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठीचा आपला १३ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अनुभवी शाई होप या सामन्यातून पुनरागमन करेल. तर, युवा जेडेन सेअल्स याला देखील संधी देण्यात आली आहे.
होपने चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवले
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचे मुख्य निवडकर्ता रॉजर हार्पर यांनी ही संघ निवड घोषित केली. या संघात स्थान देण्यात आलेल्या शाई होप व कायरन पॉवेल यांच्या निवडीविषयी बोलताना हार्पर म्हणाले, “आम्ही एक उत्कृष्ट संघ तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. मागील दोन मालिकांमधील कामगिरीचा विचार करून तसेच पुढील मालिका लक्षात ठेवून ही संघनिवड करण्यात आली आहे. होपने श्रीलंकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्यासह, कायरन पॉवलने देशांतर्गत प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवले. याच आधारावर दोघांची संघात निवड केली गेली.”
शाई होप आपला अखेरचा कसोटी सामना मागीलवर्षी इंग्लंड दौऱ्यावर खेळला होता. तर, पॉवेल हा २०१८ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
जेडेन सेअल्स अत्यंत प्रतिभाशाली
हार्पर यांनी प्रथमच वेस्ट इंडिज संघात निवड झालेला १९ वर्षीय वेगवान गोलंदाज जेडेन सेअल्स याचे कौतुक करताना म्हटले, “जेडेन अत्यंत प्रतिभाशाली आहे. तो युवा असून त्याच्यात उत्साहाची कमी नाही. ‘बेस्ट वि बेस्ट’ सामन्यांमध्ये त्याने अतिशय वेगात गोलंदाजी केलेली. त्याच्याकडे बळी मिळवण्याची क्षमता असून, त्याच्या येण्याने गोलंदाजी आक्रमणाला धार येईल.” या संपूर्ण संघात सेअल्स व्यतिरिक्त आणखी कोणीही नवीन खेळाडू नाही.
🌴 West Indies have named a 13-man squad for the first #WIvSA Test, starting 10 June. pic.twitter.com/ME8OFF1Blv
— ICC (@ICC) June 8, 2021
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी साठी वेस्ट इंडिज संघ:
क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मन ब्लॅकवूड (उपकर्णधार), नकुम्राह बॉनर, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शाई होप, जोशुआ डि सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, कायले मायर्स, कायरन पॉवेल, केमार रोच व जेडेन सेअल्स.
महत्त्वाच्या बातम्या-
‘असं कोणीही नसेल ज्याला पाकिस्तानकडून खेळायचे नाही,’ पाकिस्तानी मूळ असलेल्या ताहिरचे भाष्य
न्यूझीलंडला जबर धक्का! विलियम्सनला घेरले दुखापतीने, दुसऱ्या कसोटीतून झाला बाहेर
शेफाली भारतीय क्रिकेटची ‘फ्युचर स्टार’, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने थोपटली पाठ