एकीकडे सर्वांच्या नजरा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर खिळल्या असताना, दुसरीकडे पर्थ कसोटी संपल्यापासून 2023-25 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर पुन्हा एकदा बदल दिसून आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 5 डिसेंबरपासून ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूने खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांग्लादेश संघाच्या विजयामुळे डब्ल्यूटीसीच्या तिसऱ्या आवृत्तीच्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सर्कलमध्ये बांग्लादेशने शेवटची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. बांग्लादेशने जमैकाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना 101 धावांनी जिंकला. या विजयासह संघाने डब्ल्यूटीसी 2023-25 च्या गुणतालिकेत 31.25 गुणांसह 8वे स्थान पटकावले. त्याचवेळी या पराभवामुळे वेस्ट इंडिज संघाचे नुकसान झाले असून त्यात ते आता शेवटच्या स्थानावर पोहोचले आहेत. आता त्यांना यात सुधारणा करण्याची संधी आहे. ज्यामध्ये त्यांना पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या 61.11 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ जो पर्थ कसोटीपूर्वी पहिल्या क्रमांकावर होता. तो आता 57.69 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. ज्यात त्यांचे 59.26 गुण आहेत.
हेही वाचा-
IND VS AUS; ॲडलेड कसोटीपू्र्वी फलंदाजी स्थितीच्या प्रश्नावर केएल राहुलचे धक्कादायक उत्तर
’10 वर्षे झाली मी एमएस धोनीशी बोलत नाही….’ माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा
ॲडलेड ‘कोहली-कोहली’च्या घोषणांनी दणाणले, ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजांची हवा