---Advertisement---

जगप्रसिद्ध मॉडेलच्या जाळ्यात अडकला ‘हा’ केकेआरचा धुरंधर, एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

On: रविवार, मे 9, 2021 2:21 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज आणि आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा आंद्रे रसेल हा संपूर्ण क्रिकेटजगताला परिचित आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजी आणि डॅशिंग हेअर स्टाईलचे वेस्ट इंडिजमध्येच नव्हे तर भारतात देखील लाखो चाहते आहेत. रसेल जर चांगल्याच फॉर्ममध्ये असेल तर, तो एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो. रसेल प्रमाणे त्याच्या पत्नीनेही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेदरम्यान रसेलची पत्नी जेसिम लोरा रसेलही अनेकदा स्टेडियममध्ये येऊन त्याला चियर करताना दिसून आली आहे. रसेलच्या आयुष्यात येण्यापूर्वी जेसिम लोरा रसेलने आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. जेसिम व्यवसायाचे एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

जेसिम लोरा रसेल ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंटवर साडे तीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. ज्यावर ती आपले मॉडेलिंगचे फोटोज् शेअर करत असते. तिचा जन्म अमेरिकेतील मियामीमध्ये झाला होता. तसेच तिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. अनेक ॲड कॅम्पेन, ब्रँड्ससोबत काम करून तिने मॉडेलिंग क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग व्यतिरिक्त या सौंदर्यवतीला शॉपिंग, फिरायला आणि पार्टी करायला खूप आवडते.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लोरा आणि आंद्रे रसेल यांनी २०१४ मध्ये साखरपुडा केला होता आणि २०१६ मध्ये हे दोघेही विवाह बंधनात अडकले होते. विवाह झाल्यानंतर ही अमेरिकन मॉडेल आता आपल्या पतीसह जमायकामध्येच राहत आहे. या दोघांच्या आयुष्यात तिसरा पाहुणा देखील आला आहे. दोघांनीही आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी शेअर केली होती. मुलीचा जन्म झाला असला तरीही तिने आपले वैयक्तिक आयुष्य आणि मॉडेलिंग दोघांमधील साम्य टिकवून ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकारियावर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे जिवलग वडिलांचे निधन

आयपीएलमध्ये शतक झळकावणारा ‘हा’ धुरंधर आहे टीम इंडियाचं भविष्य, माजी निवडकर्त्याने व्यक्त केला विश्वास

मालदीवच्या बारमध्ये डेविड वॉर्नर आणि समालोचकामध्ये झाली हाणामारी! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---