नेदरलँड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली आहे. शनिवारी (०४ जून) उभय संघात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना झाला. या सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजने नेदरलँडला २० धावांनी पराभूत करत वनडे मालिकाही ३-० च्या फरकाने जिंकली आहे. यापूर्वीचा पहिला वनडे सामना वेस्ट इंडिजने ७ विकेट्सने जिंकला होता, तर दुसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला होता.
नेदरलँड आणि वेस्ट इंडिजमधील (Netherlands vs West Indies) तिसऱ्या वनडे सामन्यात (Third ODI) प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर ३०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड संघ ४९.५ षटकात २८८ धावांवर सर्वबाद झाला.
वेस्ट इंडिजच्या भल्यामोठ्या ३०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडकडून वरच्या फळीतील फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. सलामीवीर मॅक्स ओडॉडने ८ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या होत्या. तसेच विक्रमजीत सिंगने १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावा जोडल्या होत्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली होती. तसेच मुसा अहमदनेही ४२ धावा जोडल्या होत्या. मात्र या तिघांच्या विकेट गेल्यानंतर इतर फलंदाजांना विशेष योगदान देता आले नाही. त्यामुळे २८८ धावांवरच नेदरलँडचा संघ गुंडाळला गेला.
3-0! A thrilling finish to the series! 💥
Well played boys!👏🏿 #NEDvWI pic.twitter.com/n87EwYLCBX
— Windies Cricket (@windiescricket) June 4, 2022
या डावात वेस्ट इंडिजकडून शेरमॉन लेविसने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अकिल होसेन आणि हेडन वॉल्श यांनीही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून सलामीवीर कायले मेयर्स आणि शामार्ह ब्रूक्सने शतकी खेळी केल्या होत्या. मेयर्सने ७ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक १२० धावा चोपल्या. तर ब्रूक्सने नाबाद १०१ धावा फटकावल्या. या दोघांच्या मोठ्या खेळींच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. या डावात नेदरलँडकडून वेन बिक, वीवीयन किंगमा, रयान क्लेन, बस डे लीडे आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्सवर ४३ वर्षांनंतर घडली ही घटना, ‘गोल्डन डक’वर चक्क धावबाद झाला न्यूझीलंडचा फलंदाज
कुणाला ऑटोग्राफ दिले, कुणाशी गप्पा मारल्या, तर कुणाला पॅड्स भेट दिले; नील वॅगनरचं होतंय कौतुक
कौतुक करा कौतुक! क्रिकेटला मिळाला दुसरा युवराज, पठ्ठ्याने टी१० लीगच्या एका ओव्हरमध्ये ठोकले ६ षटकार