गेल्या जवळपास एक दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. परंतु, त्याला गेल्या जवळपास 3 वर्षांत क्रिकेटमध्ये खराब वेळेला सामोरे जावे लागले. या दरम्यान त्याला जवळपास 1000 दिवसत एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही. 70 शतके झळकावल्यानंतर आलेला हा दुष्काळ गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यात शतक झळकावल्यावर संपला. याबाबातच वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने आपले मत मांडले आहे.
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार वेगवान गोलंदाज यांनी विराट कोहली (Virat kohli) च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते विराटसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संघर्ष नवीन नाही. सर्वच महान फलंदाज खराब टप्प्यातून जात असतात. विराट एक मोठ फलंदाज असल्याचे त्यांनी सांगीतले. सोबतच त्यांनी विराटने पुढे अजून खेळले पाहिजे असेही ते म्हणाले.
माध्यमांतील वृत्तांना दिलेल्या मुलाखतीत कर्टली एम्ब्रोस (Curtly Ambrose) म्हणाले की, “विराट अजूनही खूप चांगला क्रिकेट आहे, तो एक दर्जेदार फलंदाज आहे. प्रत्येक महान फलंदाज क्रिकेटमध्ये वाईट टप्प्यांतून जातो जिथे त्याला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मला असा कोणताही महान फलंदाज माहित नाही की ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर संघर्ष केला आहे. विराट एक खास खेळाडू आहे. काही काळ असाही आला की त्याला धाव करण अवघड झाले. परंतु, आता तो परत फॉर्ममध्ये आला आहे.”
वेस्ट इंडिज पूर्व कर्णधार पुढे म्हणाले की, “विराटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अर्धशतक केले आणि नंतर शतक झळकावले. तो अधिक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तो खूप चांगला खेळत आहे आणि जुन्या काळातील विराट कोहलीसारखा दिसत आहे. पुढील काही वर्षे तो भारतीय क्रिकेटची सेवा करतान दिसला पाहिजे.” ( West Indies Capatain curtly smbrose say’s virat kohli is Best Batsman)
महत्वाच्या बातम्या-
यूएस मास्टर्स टी10 फायनलमध्ये सुपर ओव्हरचा थरार! टेक्सास चार्जर्सने उंचावली ट्रॉफी
इतिहास घडला! ‘गोल्डन बॉय’ नीरजने वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये जिंकले पहिले सुवर्ण