भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेची सुरुवात बुधवारी (12 जुलै) डॉमनिकामध्ये झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकण्यात अपयश आले आणि भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्या कसोटी पदार्पणाच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. पण अखेर बुधवारी त्यांना ही संधी मिळाली. या दोन्ही युवा खेळाडूंकडून भारतीय संघ आणि चाहत्यांना चांगल्याच अपेक्षा आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांविषयी म्हणाला, “पदार्पण करणाऱ्या दोघांनीही या सामन्याचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. इतपर्यंत येण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांना पहिल्या सामन्यात काही खास आठवणी बनवता याव्या आणि त्यांना मोकळेपणाने खेळता यावे, यासाठी माझा प्रयत्न असेल.” विराट कोहली
पहिल्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीड – क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, ऍलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, केमार रोच, अल्झारी जोसेफ, रहकीम कॉर्नवॉल, जोमेल वॉरिकनॉ
(West Indies chose to bat first in first Test against India)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
24व्या ग्रँडस्लॅमपासून नोवाक जोकोविच दोन पावलं दूर! रूसच्या रुबलेवला मात देत उपांत्य सामन्यात धडक
‘लाईन नाही लागली …’, भारतीय संघातील फास्टर्सची कमी कर्णधार रोहितलाही जाणवली