Loading...

विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी२०साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा टी20 सामना पार पडणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी हैदराबादला झालेल्या टी20 सामन्यात खेळलेले 11 खेळाडूच आजच्या सामन्यातही भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहेत.

तसेच या सामन्यासाठी वेस्ट इंडिज संघात एक बदल करण्यात आला आहे. त्यांनी दिनेश रामदिन ऐवजी निकोलस पुरनला 11 जणांच्या संघात स्थान दिले आहे.

या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Loading...

आजच्या सामन्यासाठी असे आहेत 11 जणांचे संघ – 

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल.

Loading...

वेस्ट इंडिज – लेंडल सिमन्स, एव्हिन लुईस, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, खॅरी पिएर, हेडन वॉल्श, शेल्डन कोट्रेल, केसरिक विल्यम्स.

You might also like
Loading...