अँटिग्वा। आजपासून (22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेने भारत आणि वेस्ट इंडीज संघ कसोटी चॅम्पियनशीपमधील त्यांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारताकडून मयंक अगरवाल आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीला उतरणार आहेत. तर यष्टीरक्षक म्हणून आज 11 जणांच्या संघात रिषभ पंतला वृद्धिमान सहा ऐवजी पसंती देण्यात आली आहे.
याबरोबरच भारतीय संघाने या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती दिली असल्याने कुलदीप यादव आणि आर अश्विनला या सामन्यासाठी संधी मिळालेली नाही. याबरोबरच रोहित शर्मालाही आजच्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.
या सामन्यातून वेस्ट इंडीजकडून शामर्ह ब्रूक्स कसोटी पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडीजनेही 4 वेगवान गोलंदाजांना आज 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीज – क्रेग ब्रॅथवेट, जॉन कॅम्पबेल, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमेयर, रोस्टन चेस, शामर्ह ब्रूक्स, जेसन होल्डर (कर्णधार), मिगुएल कमिन्स, केमर रोच, शॅनन गॅब्रिएल
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विकेट्सचे ‘द्विशतक’ पूर्ण करताच जडेजाचा होणार या खास यादीत समावेश
–कर्णधार कोहलीकडून रिकी पॉटिंगच्या या खास विक्रमाला धोका…
–५५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्यापासून स्टुअर्ट ब्रॉड केवळ ३ विकेट्स दूर