Loading...

कर्णधार कोहलीकडून रिकी पॉटिंगच्या या खास विक्रमाला धोका…

आजपासून(22 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटिंगच्या एका खास विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर विराटने शतकी खेळी केली तर त्याचे हे भारताचा कर्णधार म्हणून कसोटीतील 19 वे शतक असेल.त्यामुळे तो कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत पॉटिंगसह दुसऱ्या स्थानावर येईल. पॉटिंगने कर्णधार म्हणून कसोटीत 19 शतके केली आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. स्मिथने कर्णधार म्हणून कसोटीत 25 शतके केली आहेत. 

विराट सध्या या यादीत पॉटिंग पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने 46 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना 18 शतके केली आहेत.

Loading...

कसोटीमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार – 

25 शतके – ग्रॅमी स्मिथ

19 शतके – रिकी पॉटिंग

18 शतके – विराट कोहली

15 शतके – ऍलेन बॉर्डर

15 शतके – स्टिव्ह स्मिथ

15 शतके – स्टिव्ह वॉ

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

५५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्यापासून स्टुअर्ट ब्रॉड केवळ ३ विकेट्स दूर

‘कॅप्टनकूल’ धोनीच्या त्या सर्वात मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची कर्णधार कोहलीला संधी

भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्याआधीच विंडीजला मोठा धक्का!

You might also like
Loading...