टी20 विश्वचषक 2024 सुपर-8 फेरीच्या मध्याावर यजमान वेस्ट इंडिज संघाला मोठ धक्का बसला आहे. कारण संघाचा स्टार खेळाडू विश्वचषकातून बाहेर पडला आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज ब्रैंडन किंगला दुखापती मुळे विश्वचषकातील उर्वरीत राहिलेल्या सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. पुढील सामन्यानमध्ये वेस्ट इंडिज संघाला त्याची उणीव भासणार आहे. ब्रैंडन किंगच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून वेस्ट इंडिजने काइल मेयर्सची घोषणा केली आहे. आयसीसीने देखील यासाठी मंजुरी दिली आहे. तर आता ब्रैंडन किंगच्या जागी काइल मेयर्स वेस्ट इंडिजकडून खेळताना पहायला मिळणार आहे.
वेस्ट इंडिज बोर्डने विनंती केलेल्या याचिकेला शुक्रवारी 21 जून आयसीसीने ब्रैंडन किंगच्या जागी काइल मेयर्सला रिप्लेसमेंट म्हणून मान्यता दिली. काइल मेयर्स वेस्ट इंडिजच्या अमेरिकाविरुद्धच्या सामन्यासाठी उपल्बध नव्हता. डावखुरा फलंदाज काइल मेयर्स शानदार फाॅर्म मध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी 37 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
🚨 West Indies opener has been ruled out of the #T20WorldCup 2024 due to injury as they confirm a replacement.
Details ⬇️https://t.co/ZXuXueKUsz
— ICC (@ICC) June 21, 2024
ब्रैंडन किंग बद्दल बोलायचे झाले तर सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध त्याला दुखापत झाली होती. सामन्यातून तो रिटायर्ड हर्ट झाला. दुखापत गंभीर असल्याने आता तो विश्वचषकातून बाहेर पडला आहे. तर काइल मेयर्स 22 जून पर्यंत वेस्ट इंडिज संघात शामिल होणार आहे. 23 जून रोजी होणाऱ्या दक्षिण अफ्रिका विरुद्ध सामन्यात संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर सुप यजमान संघाने अमेरिके विरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. संघाने 9 विकेट्स आणि 55 चेंडू राखून सामना जिंकला आहे. या विजयासह संघ सेमी फायनलच्या शर्यतीत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
निकोलस पूरननं मोडला ‘युनिव्हर्स बॉस’चा 12 वर्ष जुना रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू
जेव्हा कॅप्टन कूल धोनी भर मैदानात नडला! बांगलादेशी खेळाडूला धक्का मारून केला होता मोठा राडा
टी20 विश्वचषकात दिसली अमेरिकन पॉवर! कर्णधारानं हाणला 101 मीटर उत्तुंग षटकार; VIDEO व्हायरल